एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्याचे जवळचे नातेवाईक बाहेरगावी असतील तर अशावेळी मृतदेह कोठे आणि सुरक्षित कसा ठेवायचा असा प्रश्न नातेवाइकांना पडतो. त्याकरिता शवागरात ठेवण्याशिवाय पर्याय राहत नाही. ही समाजाची गरज ओळखून सर्व समाजासाठी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरतर्फे अंत्यदर्शनासाठी अंत्यत सुरक्षित व उपयुक्त अशी कोठेही हलवता येणारी ही ‘अंत-शैय्या’ अशी शीतपेटी आहे. अशा प्रकारची सुविधा असलेली पेटी कोल्हापुरात प्रथमच उपलब्ध झाली आहे. ही पेटी रोटरी समाज सेवा केंद्र, कलेक्टर ऑफीस रोड, नागाळा पार्क येथे अगदी माफक दरात भाडे तत्त्वावर ती सर्वासाठी उपलब्ध आहे. या शीतपेटीच्या सादरीकरणावेळी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरचे अध्यक्ष मेघराज चुघ, सचिव कुशल राठोड, समाज सेवा केंद्र अध्यक्ष राजेंद्र देशिंगे, सचिव गिरीश जोशी, माजी गव्हर्नर प्रताप पुराणिक व रोटरीचे सर्व सभासद उपस्थित होते.
फोटो : १८०९२०२१-कोल-रोटरी
आेळी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरतर्फे सर्वांसाठी उपलब्ध केलेल्या अंत-शैय्या या शीतपेटीचे नागाळा पार्कातील रोटरी समाज केंद्रात सादरीकरण प्रसंगी व्ही.एन. देशपांडे, अमित माटे, प्रताप पुराणिक, नासिर बोरसादवाला, राजेंद्र देशिंगे, कुशल राठोड, करुणाकर नायक, मोहन पटेल, मेघराज चुघ, गिरीश जोशी उपस्थित होते.