शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

मुरगूडमध्ये दरोडेखोरांचा धुमाकूळ

By admin | Updated: August 12, 2014 00:55 IST

सहा घरे फोडली : दरोडेखोरांची दगडफेक; दोन घरांतून २५ तोळे सोन्यासह नऊ लाखांचा ऐवज लंपास

मुरगूड : शहरात दरोडेखोरांनी आज, सोमवारी पहाटे धुमाकूळ घातला. त्यांनी सहा घरे फोडली. चार ठिकाणी त्यांच्या हाती काही लागले नाही. मात्र, जमादार चौकामधील भरवस्तीतील अनिसखान इकबाल जमादार यांच्या घरातून पंचवीस तोळे सोन्याचे दागिने, पन्नास हजारांची रोकड, मोटारसायकल यांसह अंदाजे नऊ लाखांचा ऐवज लंपास केला. अन्य एका घरातील पाच ग्रॅम सोन्याचे, काही चांदीचे दागिने व पाच हजारांची रक्कम दरोडेखोरांनी लांबविली. आरडाओरडा करणाऱ्या एका नागरिकावर त्यांनी दगडफेकही केली. यामुळे शहरवासीयांत घबराट पसरली आहे. याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, एस. टी. स्टँडच्या मागील बाजूस असणाऱ्या ज्ञानेश्वर कॉलनीमध्ये नितिकेश पाटील यांचा बंगला आहे. त्यांच्या वरील मजल्यावर तलाठी पुरुषोत्तम रमेशचंद्र ठाकूर राहतात. आज पहाटे साडेतीनच्या सुमारास मोठा आवाज झाल्याने ठाकूर गॅलरीत आले. त्यावेळी त्यांना बंगल्याच्या खाली दोन व्यक्ती कडी-कोयंडे तोडत असल्याचे दिसले. त्यांना पाहून ठाकूर यांनी मोठमोठ्याने ओरडण्यास सुरुवात केली. त्यामुळे ते दोघे व रस्त्यावर उभे असलेल्या चौघांनी ठाकूर यांच्या दिशेने दगड, विटा फेकण्यास सुरुवात केली. त्यांच्या हातामध्येही धारदार शस्त्रे होती. दगडफेक होऊ लागल्याने ठाकूर यांनी आत येऊन तत्काळ मुरगूड पोलीस, तहसीलदार, आदींना फोनवरून ही माहिती दिली.पोलिसांनी ही घटना गस्तीवरील पोलिसांना कळविली. /पान ९ वरशहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. ह. भ. प. श्रीकृष्ण देशमुख यांच्या बंगल्यावरही असाच धाडसी दरोडा पडला होता. त्याचा तपास अद्याप लागला नसताना पुन्हा हा दरोडा पडला. त्यामुळे या चोरट्यांना काहीही करून पोलिसांनी अटक करावी, अशी मागणी होत आहे. सहाजणांचा समावेशनितिकेश पाटील यांच्या बंगल्याचे कुलूप तोडताना झालेल्या आवाजाने जागे झालेले तलाठी ठाकूर यांनी चोरट्यांना पाहिले आहे. ते सहाजण होते. प्रत्येकाच्या हातामध्ये सुरी, सत्तूर अशी हत्यारे होती. याशिवाय त्यांनी स्वेटर, टोपी घातली होती. दोघांनी अंगावर चादर घेतली होती, अशी माहिती त्यांनी सांगितली.