शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

इसवी सन पूर्वकाळात कोकणातून भारतात आले रोमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:17 IST

संदीप आडनाईक/लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : इसवी सन पूर्वकाळात रोमन भारतात व्यापारासाठी आले होते, याचा नाणेघाटातील शिलालेख उपलब्ध होता; ...

संदीप आडनाईक/लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : इसवी सन पूर्वकाळात रोमन भारतात व्यापारासाठी आले होते, याचा नाणेघाटातील शिलालेख उपलब्ध होता; परंतु त्यांनी कोकणातून भारतात प्रवेश केल्याचे आणि तेथून ते सर्व भारतभर पसरल्याचे नवे संशोधन सांगली जिल्ह्यातील कुरळपचे युवा संशोधक सचिन भगवान पाटील यांनी केले आहे. रोमन व्यापाऱ्यांनी जाणीवपूर्वक मागे ठेवलेल्या दिशादर्शक दगडी चक्रव्यूहाच्या चिन्हांमुळे नवा पुरातत्वीय शोध उजेडात आला आहे.

रोमशी संबंध दृढ करणारी चार दगडी चक्रव्यूहे त्यांना सांगली जिल्ह्यात आढळली आहेत. ढेंगेवाडी, ऐतवडे बुद्रुक आणि वशी येथे तीन (ता. वाळवा), तर मळणगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे एक, अशा या चार दगडी चक्रव्यूहांचा त्यांनी अभ्यास करून त्यावर सादर केलेल्या या आठ पानी पुरातत्वीय शोधनिबंधाला शुक्रवारी लंडनच्या केर्डोरिया "CAERDROIA" The Journal of Maze and Labyrinth या मासिकाच्या पहिल्या पानावर स्थान मिळाले आहे.

सचिन पाटील हे गेल्या पाच वर्षांपासून ‘चक्रव्यूह व त्याच्या भारतातील पुरातन रचना’, तसेच ‘या संरचनेचा महाराष्ट्रातील अवशेष व इसवी सनपूर्व इंडो-रोमन व्यापारीसंबंध’ या अनुषंगाने अभ्यास करीत आहेत. रोमन चलन ‘क्रेट क्वाइन’वर ही चक्रव्यूह मुद्रा आजही आढळते.

या पाऊलखुणा जपण्याची गरज

दरम्यान, शाहूवाडी तालुक्यातील मानोली, गजापूरजवळील रानातही याच प्रकारचे उद्‌ध्वस्त चक्रव्यूह आढळले असून, बॉक्साइडचे उत्खनन, रिसॉर्टसाठी, तसेच रत्नागिरीहून येणाऱ्या गॅस पाइपलाइनसाठी या पुरातत्वीय पाऊलखुणा जेसीबीच्या साहाय्याने नष्ट झाल्याचा दुर्दैवी प्रकार उघड झाला आहे. अशाच पाऊलखुणा कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड, तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही आहेत, त्या पुढील जागतिक संशोधनासाठी जपण्याची गरज आहे.

रोमन-पश्चिम महाराष्ट्र व्यापाराचा नवा संदर्भ

या नव्या संशोधनामुळे रोमन पश्चिम महाराष्ट्रातून विशेषत: भारतात व्यापारासाठी प्रवेश करत होते, हा नवा संदर्भ उजेडात आला आहे. ते सातवाहन काळात समुद्रमार्गे भारतात आले आणि त्यांनी पठारी प्रदेशात येताना दिशादर्शक म्हणून या काही दगडी चक्रव्यूह रचना मांडल्या. यापूर्वी प्रो. सांकरिया यांच्या कोल्हापुरातील ब्रह्मपुरीतील उत्खननातील संदर्भ याला पूरक आहेत. या उत्खननात आढळलेली रोमन समुद्रदेवता पोसायडनची मूर्ती आजही कोल्हापूरच्या टाउन बागेतील पुरातत्व संग्रहालयात आहे, अशी माहिती इतिहास अभ्यासक गणेश नेर्लेकर-देसाई यांनी दिली आहे.

कोट

इसवी सनपूर्व इंडो-रोमन व्यापारी संबंध यामुळे प्रकाशात आले आहेत. रोमन समुद्रमार्गे भारतात आले आणि कोकणातून नागपूरपर्यंतच्या पठारी भागात व्यापारासाठी पसरले. त्यामुळे त्यांनी दिशादर्शक म्हणून ही चक्रव्यूहाची रचना केली. जगाच्या दृष्टीने हे नवे संशोधन आहे. या परिसरातील लोकांनी अशा जुन्या पाऊलखुणा नष्ट करू नयेत.

-डॉ. पी.डी. साबळे, विभागप्रमुख, पुरातत्व शाखा

डेक्कन कॉलेज रिसर्च इन्स्टिट्यूट अँड डिमंड युनिव्हर्सिटी, येरवडा, पुणे

---------------------

17072021-kol-sachin patil kurlap

फोटो ओळी : सचिन पाटील, कुरळपकर

17072021-kol-labyrinths map

फोटो ओळी : सांगली जिल्ह्यात या चार ठिकाणी आढळले रोमन चक्रव्यूह.

17072021-kol-labyrinths in walwa

फोटो ओळी : वाळवा तालुक्यात आढळलेले चक्रव्यूह.

फोटो : 17072021-kol-Labyrinth kavthemahnakal

फोटो ओळी : कवठेमहांकाळ तालुक्यात आढळलेले चक्रव्यूह.

17072021-kol-Crate coin.

फोटो ओळी : रोमचे चलनी नाणे क्रेट क्वाइनवरील साधर्म्य असलेली मुद्रा.

170721\17kol_1_17072021_5.jpg~170721\17kol_2_17072021_5.jpg~170721\17kol_3_17072021_5.jpg

17072021-kol-labyrinths mapफोटो ओळी : सांगली जिल्ह्यात या चार ठिकाणी आढळले रोमन चक्रव्यूह.~फोटो ओळी : वाळवा तालुक्यात आढळलेले चक्रव्यूह.फोटो : 17072021-kol-Labyrinth kavthemahnakal~17072021-kol-labyrinths in walwaफोटो ओळी : वाळवा तालुक्यात आढळलेले चक्रव्यूह.