शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

व्हॅटवरच्या अधिभाराला विरोधच व्यापार्‍यांची भूमिका

By admin | Updated: May 29, 2014 01:27 IST

जूनच्या पहिल्या आठवड्यात एलबीटी रद्द होण्याची शक्यता

 कोल्हापूर : राज्यातील ‘ड’ वर्ग महानगरपालिका हद्दीत लागू करण्यात आलेला स्थानिक संस्था कर (एलबीटी) जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्य सरकारकडून रद्द केला जाण्याची दाट शक्यता आहे. एलबीटीऐवजी आता व्हॅटमध्ये एक टक्का अधिभार लावण्यात येणार आहे. मात्र, व्यापार्‍यांचा या अधिभार लावण्यास विरोध असून व्हॅटमध्ये सरसकट एक टक्का वाढवावा, अशी व्यापार्‍यांनी मागणी केली आहे. त्यामुळे सरकारने जर अधिभार लावण्याचा निर्णय घेतलाच, तर मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा व्यापार्‍यांचे आंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे. व्यापार्‍यांनी कोणतीही करमाफी न मागता सुटसुटीत कर भरण्यासाठी व्हॅटमध्ये एक टक्का वाढ करावी, एवढी साधी मागणी केली होती. ज्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि आणखी एका आॅडिटला तोंड द्यावे लागणार नाही. परंतु राज्य सरकारने व्यापार्‍यांचे म्हणणे ऐकलेले नाही. व्यापार्‍यांची मागणी विनापर्याय एलबीटी रद्द करावा, अशी आहे. सुबोधकुमार समितीने दिलेल्या सर्व पर्यायांची अंमलबजावणी सरकारने केली असल्याने अधिभार लावण्याची आवश्यकता राहिलेली नाही, असे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे. परंतु राज्य सरकारकडून मिळत असलेल्या संकेतानुसार ‘व्हॅट’वर अधिभार लावून एलबीटी रद्द केला जात आहे. तशा हालचाली सरकार पातळीवर सुरु आहेत. व्हॅटचा जसा ‘सेट आॅफ’ मिळतो तसा अधिभारचा सेटआॅफ मिळाला नाही तर तो भुर्दंड व्यापार्‍यांवर पर्यायाने ग्राहकांवर पडणार आहे. उदाहरण द्यायचे झाले तर एक व्यापार्‍याने मुंबईहून एक लाखाचा माल आणला तर त्यावर तो साडेबारा हजार रुपये व्हॅट भरत असतो. आणि नंतर तो माल विकू न जर त्याने ग्राहकाकडून पंधरा हजार रुपये व्हॅट भरुन घेतला असेल तर तो सरकारला अडीच हजार रुपये भरतो. म्हणजे खरेदी विक्रीतील फरकावर तो व्हॅट भरतो. परंतु जर व्हॅटवर अधिभार लावला, तर मात्र सेट आॅफ न मिळाल्याने पहिल्यांदा साडेबारा हजार आणि माल विक्री केल्यावर पंधरा हजार रुपये भरावे लागणार आहेत. शिवाय दुहेरी आॅडिटला सामोरे जावे लागेल. म्हणूनच अधिभार लावण्याला विरोध आहे. त्याच्या ऐवजी व्हॅटमध्ये सरासरी एक टक्का वाढवावा, अशी मागणी आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्य विधीमंडळाचे अधिवेशन होत असून त्याच्या आधीच राज्यातील एलबीटी रद्द करुन व्हॅटवर अधिभार लावला जाणार आहे. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावरच व्यापारी आणि राज्य सरकार यांच्यात पुन्हा एकदा जुंपण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)