शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील पूररेषेतील बांधकामांबाबतही मार्ग काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:20 IST

कोल्हापूर : शहरातील निळी रेषा ते लाल रेषा यांमधील अनेक बांधकाम प्रकल्पांना परवानगी मिळालेली नाही; परंतु ...

कोल्हापूर : शहरातील निळी रेषा ते लाल रेषा यांमधील अनेक बांधकाम प्रकल्पांना परवानगी मिळालेली नाही; परंतु नव्या नियमावलीतील तरतुदींचा आधार घेऊन याबाबत योग्य ते निर्देश कोल्हापूर महापालिकेला देणार असल्याची ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिली.

क्रिडाई महाराष्ट्र, असोसिएशन ऑफ आर्किटेक्चर ॲण्ड इंजिनिअर्स आणि वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर यांच्यातर्फे राज्यात युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल ॲण्ड प्रमोशन रेग्युलेशन लागू केल्याबद्दल शुक्रवारी संध्याकाळी शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार धैर्यशील माने, ‘पुढारी’चे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महाराष्ट्र क्रिडाईचे अध्यक्ष राजीव परीख, कोल्हापूरचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, असोसिएशन ऑफ आर्किटेक्चरचे अध्यक्ष अजय कोराणे, वेस्टर्न महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष संदीप भंडारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

सत्काराला उत्तर देताना शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा क्रांतिकारी निर्णय घेतला. वेगवेगळ्या शहरांमध्ये नियमांचे वेगळे अर्थ लावले जात होते. त्यामुळे वाद होत होते. त्यामुळे प्रकल्प रखडत होते आणि त्याचा फटका नागरिकांना बसत होता. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी, व्यावसायिक अशा सर्वांच्या सूचनांचा विचार करून हे धोरण तयार करण्यात आले. यावरूनही आरोप-प्रत्यारोप झाले. परंतु हेतू स्वच्छ असल्यामुळे घाबरण्याची गरज नाही. १५०० फुटांपर्यंतच्या घराला आता परवानगीची गरज नाही. तीन हजार फुटांच्या घराला १० दिवसांत परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. अशा अनेक सुधारणा या धोरणामध्ये केल्या आहेत. त्यामुळे गैरप्रकारांना आळा बसेल. व्यावसायिकांना काही सवलती दिल्या तरच नागरिकांना त्याचा फायदा होईल, असा विचार करूनच महाराष्ट्र शासनाने यासाठी विविध निर्णय घेतले आहेत. त्यामुळे आता ही जबाबदारी स्वीकारून नागरिकांना किफायतशीर दरात घरे द्या.

राजेश क्षीरसागर म्हणाले, निळ्या आणि लाल रेषांमधील बांधकामांना कोल्हापुरात परवानगी गरज आहे. याबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे. तसेच प्रीमिअमच्या निर्णयाचा कोल्हापूरला फायदा होणार नाही, याचाही विचार करण्यात यावा. महाराष्ट्रातील सर्वांना फायदा होईल, असे हे बांधकामविषयक धोरण तयार करण्यात आले आहे. राजीव परीख म्हणाले, महाविकास आघाडीने घेतलेला हा क्रांतिकारी निर्णय असून याचे श्रेय एकनाथ शिंदे यांचे आहे. गेल्या काही वर्षांत बांधकाम व्यवसायाला मरगळ आली होती. ती या धोरणामुळे दूर होणार आहे. ललित गांधी म्हणाले, या बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी निर्णय घेतलेला नसून तो राज्याच्या विकासासाठी घेतला आहे.

चौकट

प्रीमियमचा निर्णय ऐच्छिक

बांधकाम व्यावसायिकांना प्रीमियममध्ये ५० टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला असला तरी कोल्हापूरमध्ये प्रीमियम कमी आहे आणि स्टॅम्प ड्यूटी जास्त आहे. ही वस्तुस्थिती सांगितल्यानंतर हा निर्णय ऐच्छिक आहे. तो स्वीकारावाच अशी जबरदस्ती नाही. स्थानिक परिस्थितीनुसार तुम्ही निर्णय घेऊ शकता, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

चौकट

१७ जानेवारीला कार्यशाळा

या नव्या धोरणाची सर्वंकष माहिती देण्यासाठी १७ जानेवारीला कोल्हापूरमध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी हे यावेळी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याचे सांगण्यात आले.

०८०१२०२१ कोल क्रिडाई

क्रिडाई व अन्य संस्थांच्या वतीने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा शुक्रवारी सत्कार करण्यात आला. यावेळी डावीकडून राजीव परीख, विद्यानंद बेडेकर, ललित गांधी, जयेश ओसवाल, अजय कुरणे, डॉ. योगेश जाधव, राजेश क्षीरसागर, धैर्यशील माने उपस्थित होते.

छाया : आदित्य वेल्हाळ