शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते हस्तांतर अधांतरीच

By admin | Updated: June 28, 2017 00:37 IST

ठराव अद्याप महापौरांकडेच : उलटसुलट चर्चेला जोर

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘दोन कोटींचा आंबा’ पाडल्याचा आरोप तसेच सभागृहात झालेला तीव्र विरोध यामुळे पदरी बदनामी पडलेल्या रस्ते हस्तांतरण ठरावावर महापौर हसिना फरास यांनी सही केली नसल्याने हा विषय अधांतरीच लटकला आहे. सभेचा इतिवृत्तांत तयार झाल्यानंतर प्रक्रियेनुसार रस्ते हस्तांतराचा ठराव नगरसचिव कार्यालयाकडून महापौरांकडे पाठविण्यात आला; परंतु महापौरांनी त्यावर सही केली नसल्याने पुन्हा एकदा उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली आहे. महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा २० जूनला झाली. या सभेत वादग्रस्त रस्ते हस्तांतराचा ठराव भाजप-ताराराणी आघाडीचा तीव्र विरोध मोडून काढत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतला. असा ठराव सभागृहात येण्यापूर्वीपासून काही ‘कारभारी नगरसेवकां’नी मद्य विके्रते, हॉटेल व्यावसायिकांकडून दोन कोटींची सुपारी घेतल्यची चर्चा सुरू होती. त्यामुळे महापालिका वर्तुळाचे डोळे विस्फारले होते. ही चर्चा सुरू असताना पुरवणी अजेंड्यावर उपमहापौर अर्जुन फरास व काँग्रेस गटनेते शारंधर देशमुख यांनी रस्ते हस्तांतरणाचा सदस्य ठराव ठेवला होता. त्यामुळे यावर कोणता निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. हा ठराव मंजूर करून घेण्याकरिता मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाल्याची चर्चा कर्णोपकर्णी सुरू होती. तर २० जूनच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक सुनील कदम यांनी ठराव मंजूर करून देण्यासाठी दोन कोटींची सुपारी फुटल्याचा जाहीर आरोप केला, तर तो मंजूर करू नये म्हणून भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी सभागृहात ‘गोंधळी’चे रूप धारण करत जोरदार विरोध केला होता. तरीही बहुमताच्या जोरावर सत्तारूढ काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीने तो मंजूर करून घेतला. या ठराव मंजूर झाल्यामुळे नगरसेवकांची बदनामी अधिक झाली. सभा झाल्यानंतर प्रक्रियेनुसार मंजूर झालेला ठराव नगरसचिव कार्यालयाकडून महापौर फरास यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. ज्या तडफेने हा ठराव मंजूर करून घेतला त्याच तडफेने तो महापौर फरास सही करून पुढील प्रक्रियेसाठी प्रशासनाकडे पाठवतील, अशी शक्यता होती; पण महापौरांनी त्यावर सहीच केलेली नाही. ठरावावर त्या लवकर सही करतील असे दिसत नाही. बदनामी झाल्याची महापौरांची भावनारस्ते हस्तांतराच्या ठरावानंतर महापौर फरास व्यथित झाल्या आहेत. कारण या ठरावामुळे आपली बदनामी झाल्याची त्यांची भावना झाली आहे. मुळात २० जूनला सभा ही उपमहापौर अर्जुन माने यांना देण्यात येणार होती, परंतु सभागृहात होणारा संभाव्य गोंधळ लक्षात घेऊन फरास यांनीच अध्यक्षस्थानी बसावे, असा निर्णय झाला. ठरावावर सही न करण्यास केवळ बदनामीचे कारण आहे की अन्य कोणते कारण आहे याविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहे.