शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते हस्तांतर, पुढाकार घ्यायचा कोणी?

By admin | Updated: April 10, 2017 23:57 IST

मनपा महासभेत प्रस्ताव येण्याची शक्यता नाही : प्रशासनास राज्य सरकारच्या आदेशाची प्रतीक्षा

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील सर्वप्रकारची दारूची दुकाने बंद झाल्यामुळे कोल्हापूर महापालिका हद्दीतील रस्ते राज्य सरकारने मनपा प्रशासनाकडे हस्तांतर करण्याचा पर्याय पुढे आला असला तरी या कामाला सुरुवात कोणी करायची आणि कोणत्या मुद्द्यांवर करायची, असा प्रश्न तयार झाला आहे. मनपा प्रशासन राज्य सरकारच्या आदेशाची प्रतीक्षा करत आहे. त्यामुळे १९ एप्रिलला होणाऱ्या महासभेत तसा प्रस्ताव येण्याची शक्यता दिसत नाही. न्यायालयाच्या दणक्यामुळे कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील बहुतांशी दारूची दुकाने बंद झाली आहेत. या निर्णयाबाबत समाजातून विशेषत: महिलावर्गातून स्वागत होत आहे. तथापि ‘लिकर लॉबी’ मात्र कमालीची अस्वस्थ झाली आहे. दररोज कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली असून अनेकांचे रोजगारही गेले आहेत. त्यातून मार्ग काढण्याकरिता पळवाट शोधण्यात आली आहे. नगरपालिका व महानगरपालिका हद्दीतून जाणारे राज्य व राष्ट्रीय महामार्गच सरकारने हस्तांतर करावेत, असा पर्याय पुढे आला आहे. राज्य सरकारही त्यादृष्टीने अनुकुल आहे. कोल्हापूर शहरातून चार राज्यमार्ग व एक राष्ट्रीय महामार्ग जातो. भविष्यात हे रस्ते हस्तांतर करायचे झालेच तर त्यात कोणी पुढाकार घ्यायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा राज्य सरकारकडून काय प्रस्ताव येतोय, याची प्रतीक्षा मनपा प्रशासन करत आहे. जर मनपा प्रशासनाने पुढाकार घेतला तर फायदा कमी आणि बदनामीच अधिक होणार आहे तसेच कोणत्या मुद्द्यावर रस्ते ताब्यात घेण्याचा प्रस्ताव द्यायचा, असा प्रश्नही त्यांच्यासमोर आहे. आजच्या घडीला हे रस्ते ताब्यात घेण्यामुळे महापालिकेचा फायदाही नाही आणि तोटाही नाही. मग आपणच का घाई करायची, अशा विचारात प्रशासन आहे. ‘लिकर लॉबी’ने महानगरपालिका व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना निवेदन दिल्यानंतर रस्त्यांची मालकी, रस्त्यांची हद्द, सध्याची परिस्थिती याबाबतची माहिती संकलित करण्याचे काम नगररचना तसेच शहर अभियंता कार्यालयाने सुरू केले आहे. रस्त्यांचे नकाशेही त्यांनी उपलब्ध केले आहेत. चार राज्यमार्ग व एक राष्ट्रीय महामार्ग सध्या मनपाच्या ताब्यात असून या मार्गाची देखभाल दुरुस्ती, पथदिवे, पावसाच्या पाण्याचा निचरा असा सर्व खर्च गेल्या अनेक वर्षांपासून मनपा प्रशासनच करत आहे. त्यामुळे हे रस्ते ताब्यात घेतल्यानंतरही तो करावा लागणार आहे. त्याचा कुठलाही अतिरिक्त भार पडणार नाही. (प्रतिनिधी) मोठा महसूल बुडतोयसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे महिलावर्गात चांगली प्रतिक्रिया असली तरी राज्यातील हजारो दारूच्या दुकानांवर संक्रांत आली आहे. त्यामुळे राज्य सरकारला मिळणारा सात ते आठ हजार कोटींचा महसूल बुडणार आहे, म्हणून सरकारमधीलच काहीजण यातून मार्ग काढत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारने नगरपालिका व महानगरपालिका यांना रस्ते ताब्यात घेण्याबाबत पत्र पाठविले जाणार असून, त्याचा मसुदाही तयार झाला असल्याचे समजते. अशा प्रकारचे पत्र लवकरच पाठविले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने आपणहून काही करायचे नाही, अशी भूमिका घेतली आहे.