शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाचं दुखणं शेतकºयांच्या ‘वाटेवर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 00:05 IST

संतोष बामणे ।लोकमत न्यूज नेटवर्कउदगाव : सांगली-कोल्हापूर महामार्गावरील उदगाव येथील बायपास मार्गावर रखडलेल्या पुलाच्या अर्धवट कामामुळे महामार्गाचं दुखणं शेतकºयांच्या वाटेवर आलं असून, कोणी रस्ता देता का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या सांगली-कोल्हापूर महामार्गाचे रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गात विलिनीकरण केल्यानंतर उर्वरित रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे उदगाव कुरण रस्त्याचा प्रश्न समोर ...

संतोष बामणे ।लोकमत न्यूज नेटवर्कउदगाव : सांगली-कोल्हापूर महामार्गावरील उदगाव येथील बायपास मार्गावर रखडलेल्या पुलाच्या अर्धवट कामामुळे महामार्गाचं दुखणं शेतकºयांच्या वाटेवर आलं असून, कोणी रस्ता देता का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या सांगली-कोल्हापूर महामार्गाचे रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गात विलिनीकरण केल्यानंतर उर्वरित रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे उदगाव कुरण रस्त्याचा प्रश्न समोर आला आहे. त्यामुळे कुरण शेतीकडील शेतकºयांचे डोळे महामार्गाच्या कामाकडे लागले आहेत.कोल्हापूर-सांगली महामार्गाचे काम गेल्या सहा वर्षांपासून सुरू आहे. यामध्ये बायपास मार्गावर उदगाव येथील टोल नाक्याजवळून महामार्गाच्या कामात या ओढ्यावर नवीन सर्व्हेनुसार पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले. त्यामुळे कुरण रस्ता तब्बल १५ फूट खोल जागेत गेला आहे. यावर शेतकºयांनी आंदोलन केल्यावर सुप्रीम कंपनीच्या अधिकाºयांनी महामार्ग ते आडवा जोड रस्त्यापर्यंत ४०० फूट अंतरावर भराव टाकून नवीन रस्ता करून देणार असल्याचे सांगितले होते. यावर या शेतकºयांनी आंदोलन मागे घेतले होते.सांगली-कोल्हापूर महामार्गावर टोलचे भूत आल्यावर, तसेच सुप्रीमच्या कामावरून व नागरिकांच्या मागणीनुसार सरकारने सांगली-कोल्हापूर महामार्ग हा रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गात विलीन केला. तमदलगे ते उदगाव टोल नाक्यापर्यंत राहिलेल्या अर्धवट कामामुळे शेतीच्या रस्त्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सध्या कुरण रस्त्यालगत अर्धवट बांधकाम झालेल्या पुलामुळे शेतकºयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शेतीकडे जाण्यासाठी रस्ता आहे. तर टोलनाक्यावरून सरळ कुरण मार्गाकडे येताना दोन्ही मार्ग अर्धवट बांधकाम झालेल्या पुलाजवळ येतात. अरुंद रस्त्यामुळे या परिसरात वारंवार अपघातही होत आहेत.कुरण शेत परिसरातील शेतकरी गेल्या पाच वर्षांपासून रस्त्यासाठी संघर्ष करीत आहेत. त्यामुळे शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे सर्व बाजूने शेतकºयांनाच त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे बायपास मार्ग अपूर्णच ठेवा; पण आमचा रस्ता आम्हाला सुरळीत द्या, अन्यथा शेतकरी आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.