शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोडणी, वाहतूक कामगारांचा मंत्रालयावर धडक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 20:28 IST

कोल्हापूर : राज्यातील ऊसतोडणी व वाहतूक कामगारांच्या विविध मागण्यांकडे राज्य शासनाने व साखर आयुक्तांनी दुर्लक्ष केले आहे. त्याबाबत महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्यावतीने दि. १९ सप्टेंबरला मुंबई मंत्रालयावर हजारो ऊस तोडणी व वाहतूक कामगारांचा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्'ातील कामगारही मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती ...

ठळक मुद्दे भाजप-सेना सरकारनेही फसवणूक केल्याचा आरोपनवीन त्रिपक्षीय सामंजस्य करार करा,

कोल्हापूर : राज्यातील ऊसतोडणी व वाहतूक कामगारांच्या विविध मागण्यांकडे राज्य शासनाने व साखर आयुक्तांनी दुर्लक्ष केले आहे. त्याबाबत महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्यावतीने दि. १९ सप्टेंबरला मुंबई मंत्रालयावर हजारो ऊस तोडणी व वाहतूक कामगारांचा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्'ातील कामगारही मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती कामगार संघटनेचे राज्य सरचिटणीस प्रा. डॉ. सुभाष जाधव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. जाधव म्हणाले, ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या मागण्यांबाबतचे सविस्तर निवेदन मुख्यमंत्री, कामगार मंत्री, साखर आयुक्त व साखर संघास आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात देण्यात आले होते; पण त्याबाबत कोणताही निर्णय दिला नसल्याने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारप्रमाणेच भाजप-सेना आघाडीच्या सरकारने राज्यातील ऊसतोडणी कामगार, बैलगाडीवान, मुकादम, ऊस वाहतूकदार यांची उपेक्षा चालूच ठेवली आहे. उलट ऊस तोडणी व वाहतुकीचे दर ठरविण्याबाबत सध्याच्या सरकारने या कामगारांची घोर फसवणूक केली आहे. शासनाने मजुरीवाढीच्या लादलेल्या २० टक्के एकतर्फी कराराला राज्यातील १० लाख ऊसतोडणी व वाहतूक कामगारांनी विरोध केला. सध्याच्या सरकारने कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी न करता फसवणूक केली. ऊस तोडणी व वाहतूक कामगारांना माथाडी बोर्डात समाविष्ट केल्याचे परिपत्रक सरकारने काढले; पण त्याची अंमलबजावणी केलेली नाही. याचा जाब विचारण्यासाठी व त्रिपक्षीय कराराचा कालावधी २०१४ ते आॅक्टोबर २०१७ संपला असल्याने नवीन त्रिपक्षीय सामंजस्य करार करा, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे डॉ. जाधव म्हणाले.अशा आहेत मागण्या...- ऊस तोडणीच्या दरात ४० टक्के वाढ करून तो प्रतिटन २७८ रुपये करावा- ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्केवाढ करावी- मुकादमाचे कमिशन २० टक्केकरावे- ऊसतोडणी व वाहतूक कामगार मुकादम यांची माथाडी बोर्डात तातडीने नोंदणी सुरू करून त्यांना ओळखपत्र द्या.- या कामगारांसाठी प्रत्येकी पाच लाख रुपयांचा अपघात विमा, बैलजोडीचा एक लाख रुपयांचा आणि मजुरांसाठी ५० हजार रुपयांची औषध उपचाराची तरतूद असलेली विमा योजना लागू करा.- राज्यातील ऊसतोडणी व वाहतूक कामगारांसाठी माथाडी बोर्डाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने पुरेशी आर्थिक तरतूद व कर्मचारी वर्ग उपलब्ध करून द्यावे.