शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदारांमार्फतच रस्त्यांची देखभाल

By admin | Updated: May 8, 2017 00:57 IST

कंत्राटदारांमार्फतच रस्त्यांची देखभाल

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : अपुरे मनुष्यबळ, नवीन भरतीवर असलेल्या निर्बंधांमुळे रस्त्यांची देखभाल आणि दुरुस्ती कंत्राटदारांमार्फतच करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. ‘वार्षिक देखभाल करार’या अंतर्गत ही कामे करून घेतली जाणार असून लवकरच या कामाच्या निविदा काढण्यात येणार आहेत. पावसाळ्यापासून राज्यभर या पद्धतीने देखभाल-दुरुस्तीची कामे सुरू होणार आहेत. जिल्ह्यातील सर्व प्रमुख राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्ग हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतात. त्यामध्ये बहुतांशी रस्त्यांवर वाहतूकही मोठ्या प्रमाणावर असते. शक्यतो हे सर्व रस्ते जिल्ह्यांना आणि तालुक्यांना जोडणारे असल्याने त्याची देखभाल आणि दुरुस्ती ही सातत्यपूर्ण करणे आवश्यक असते; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाला या रस्त्यांची देखभाल करणे आणि दुरुस्ती करणे यावर कमालीच्या मर्यादा येत आहेत. खड्डे पडल्यानंतर मग बांधकाम विभागाची प्रक्रिया सुरू होणार. मग ते खड्डे भरले जाणार. त्यामध्ये विलंब होऊ लागला. अशातच निवृत्तीनंतर त्या जागा पुन्हा नवीन भरती करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. नियमित देखभालीसाठीही विभागाकडे माणसे नाहीत. त्यामुळे मग रस्त्यांची नियमित देखभाल आणि दुरुस्ती होत नाही. परिणामी या रस्त्यांकडे कुणाचेच लक्ष नाही, अशी परिस्थिती दिसते. त्यावर उपाय म्हणून आता ‘वार्षिक देखभाल करार’संकल्पना पुढे आली आहे. लवकरच या कामाच्या निविदा निघणार आहेत. काय आहे संकल्पना?जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांची तालुकावर विभागणी करून त्या-त्या रस्त्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांचा निविदा काढण्यात येतील. इच्छुक आणि पात्र कंत्राटदारांना निविदेनुसार रस्ता मंजूर करण्यात येईल. त्या रस्त्यावरील तेवढ्या अंतरावरील रस्त्याची दोन वर्षे देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी त्या कंत्राटदारावर राहील. सातत्याने त्या कंत्राटदाराचे त्याला मंजूर रस्त्यावर लक्ष राहणार असल्याने ही देखभाल नीट होईल, अशी अपेक्षा या संकल्पनेमागे आहे. ही कामे केली जातीलखड्डे भरणे, बाजूपट्ट्यांची दुरुस्ती, गवत काढणे, झाडांच्या वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या फांद्या काढणे, गटार काढणे, रस्त्यावर येणाऱ्या पाण्याची निर्गत करणे, पुलाचे तुटलेले रेलिंग बसवणे, कडेची सरकारी झाडे रंगवणे, वाहतुकीच्या नियमनासाठी आवश्यक असे फलक उभारणे ही सर्व कामे या कंत्राटदाराला करावी लागतील. कामे होतील त्या पद्धतीने तो बिले विभागाकडे सादर करेल व कामाची खातरजमा करून बिले अदा केली जातील. ४८ तासांत खड्डा भरणारया संकल्पनेच्या माध्यमातून रस्त्यावर खड्डा पडल्यानंतर तो ४८ तासांत भरला जाईल. त्यामुळे खड्डे मोठे होऊन त्याचा वाहतुकीला त्रास होणार नाही, अशी अपेक्षा अधिकारी व्यक्त करत आहेत. दैनंदिन देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी कंत्राटदारावर राहणार असल्याने रस्ते नेहमी नीटनेटके राहतील आणि नागरिकांसाठी सोयीचे ठरतील, असाही विश्वास अधिकारी व्यक्त करत आहेत.