शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

रंकाळ्याजवळ ‘आयआरबी’चा रस्ता खचला

By admin | Updated: October 23, 2014 00:01 IST

नागरिकांतून संताप : दोन फुटांची मोठी भेग पडून रस्ता चॅनेलसह शेतात कोसळला; खराब रस्त्यांचा नमुना उघड

कोल्हापूर/फुलेवाडी : रंकाळा-फुलेवाडी दरम्यान पेट्रोल पंपासमोरील ‘आयआरबी’चा रस्ता आज, बुधवारी पहाटे खचला. त्यामुळे रस्त्याच्या कडेला दोन फुटांची मोठी भेग पडून रस्ता व चॅनेलचा सुमारे दीडशे फुटांचा मोठा भाग शेतात कोसळला. खराब रस्त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. दुपारनंतर ‘आयआरबी’च्या कर्मचाऱ्यांनी कोसळलेल्या भागाची सफाई करण्यास सुरुवात केली.कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावरील फुलेवाडीदरम्यानचा रस्त्याचा मोठा भाग खचल्याचे पहाटे नागरिकांच्या निदर्शनास आले. रस्त्याच्या कडेला पावसाळी पाणी जाण्यासाठी तीन फुटांचे चॅनेल व त्यावर पदपथ बांधण्यात आला आहे. या पदपथासह चॅनेलचा सुमारे दीड फुटाचा मोठा भाग शेजारील शेतात कोसळला. रस्त्याच्या कडेला सुमारे दोन ते दहा फूट खोल व दोन फूट रुंदीची भेग पडली. घडल्या प्रकाराबाबत ‘आयआरबी’च्या जिल्हा व राज्य व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान, महापालिका व आयआरबीच्या कर्मचाऱ्यांनी खचलेल्या भागातील खरमाती काढण्यास दुपारी सुरुवात केली. टोलविरोधात लढा सुरू असतानाच ही घटना घडल्याने याचे पडसाद टोलनाक्यांवरही उमटत होते.नेमके कारणया परिसरात काळ्या मातीची शेती आहे. शेजारी रंक ाळा असल्याने या परिसरातील जमीनही ओलसर असते. ओली काळी माती व पाया नसल्याने येथे घरे बांधताना खोलवर पाया काढावा लागतो. मात्र, रस्तेबांधणी करताना ठेकेदाराने आवश्यक काळजी घेतलेली नाही. ‘वडाप’ काम केल्यानेच हा रस्ता खचल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.नागरिकांतून संतापयाच रस्त्यासाठी आयआरबी ३० वर्षे टोल आकारणी करणार आहे. त्यानंतर रस्ते महापालिकेकडे हस्तांतरित केले जाणार आहेत. टोलवसुलीच्या पहिल्या वर्षातच रस्त्यांची ही अवस्था आहे. ३० वर्षांनंतर रस्ते कसे असणार? यानंतर पुन्हा सत्ताधारी हे रस्ते दुरुस्तीसाठी टोल लावणार काय? असा सवाल उपस्थित करीत अस्सल कोल्हापुरी भाषेत नागरिकांनी संताप व्यक्त केला.नाक्यांवर पडसाद‘टोल प्रश्न न्यायालयात आहे, टोल देणार नाही,’ असे यापूर्वी वाहनधारक सांगत होते. आज रस्ता खचल्याने वाहनधारक टोल मागणाऱ्यांना ‘टोल पाहिजे; मग खराब रस्ते कोण पूर्ण करणार?’ असा सवाल करीत होते. त्यामुळे फुलेवाडी नाक्यावरील टोलवसुली दिवसभर बंद होती.कृती समितीतर्फे ‘रास्ता रोको’खचलेल्या रस्त्याप्रकरणी आयआरबीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सर्वपक्षीय कृती समितीतर्फे पोलिसांना करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. यामुळे कृती समितीचे कार्यकर्ते उद्या, गुरुवारी सकाळी अकरा वाजता या ठिकाणी ‘रास्ता रोको’ करणार आहेत. समितीने नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.चॅनेल निकृष्ट दर्जाचेरस्ते प्रकल्प राबविताना अनेक त्रुटी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. रस्त्याची उंची नको तितकी वाढविल्याने संपूर्ण शहराचा जमीनस्तर दीड फुटाने वाढला आहे. रस्त्याशेजारी पाण्याचा निचरा होण्यासाठी केलेले चॅनेल निकृष्ट दर्जाचे आहे. अनेक ठिकाणी हे चॅनेल अर्ध्यातच बंद आहेत. काही ठिकाणी काटकोनात वळविले आहेत. वाढलेली उंची व खराब चॅनेलचा आज पहिला दणका बसून रस्ता खचल्याचे बांधकामतज्ज्ञांचे मत आहे.