शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इंजोळे खडेखोळ दरम्यान रस्ता खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 17:54 IST

इंजोळे ते खडेखोळ दरम्यान असलेला रस्ता यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे खचला असून अवजड वाहतूक व एस.टी.च्या घुंगूर गावापर्यंत जाणार्‍या नियमितच्या सतरा फेर्‍या रद्द करण्यात अाल्या अाहेत.

ठळक मुद्देवाघबीळ —घुंगूर दरम्यान अवजड वाहतूक बंद, मोठा अनर्थ टळलाएस.टी.फेर्‍या इंजोळेपर्यंत, नियमितच्या सतरा फेर्‍या रद्द विद्यार्थांचे नुकसान

विक्रम पाटीलकरंजफेण, 4 : इंजोळे ते खडेखोळ दरम्यान असलेला रस्ता यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे खचला असून अवजड वाहतूक व एस.टी.च्या घुंगूर गावापर्यंत जाणार्‍या नियमितच्या सतरा फेर्‍या रद्द करण्यात अाल्या अाहेत.

वाघबीळ फाटा ते घुंगूर हा एकवीस की.मी.असणारा रस्ता ठराविक भाग वगळता जोरदार पावसामुळे मोठ मोठ्या खड्यांच्या विळख्यात सापडला अाहे.या मार्गावर नामांकीत शाळा महाविद्यालये असल्यामुळे नियमित मोठी वर्दळ असते. त्याबरोबर हा रस्ता डोंगरी भागातून मार्गक्रमण करत जात असल्यामुळे खराब रस्तामुळे अपघात झाल्यास मोठी जीवीत हानी होऊ शकते.त्यामुळे या रस्ताविषयी लोकमतमधून वेळोवेळी अावाज उठवण्यात अाला होता.

 लोकप्रतीनिधींनी व सार्वजनीक बांधकाम विभागाने नियमित गांधारी भूमिका घेणेच पसंद केल्यामुळे परिसरातील नागरीकांच्यामधून मोठा अपघात होऊन लोक मरण्याची वाट पहात अहात काय..? अशी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केली जात अाहे. हा रस्ता सुदैवाने दिवसा खचला नाहीतर रात्रीच्या वेळी खचला असता तर मोठा अपघात घडला असता अशी समिश्र प्रतिक्रीया लोकांच्यामधून उमटत अाहे.

  रस्ता खचल्यामुळे एस.टी.बस.इंजोळे गावापर्यंतच जात असून तेथून पुढे असलेल्या दळवेवाडी, पोवारवाडी, धनगरवाडा, शिंदेवाडी, बांदिवडे, घुंगूर, सावरेवाडी व इतर वाड्यावस्तावरून शहरात येऊन उच्चशिक्षण घेणारे जवळपास सत्तर विद्यार्थी असून नियमित ये—जा करणारे पंन्रास कामगार अाहेत.त्यामुळे विद्यार्थांची व कामगारांची तसेच डोंगरी भागातून रूग्नांना शहराकडे अाणण्यासाठी एस.टी.सेवा बंद असल्यामुळे मोठी कुचंबना झाली अाहे.तसेच विद्यार्थांचे शैक्षणीक नुकसान होत अाहे. त्यामुळे रस्ता त्वरित दुरूस्त करून लोकांची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी जोर धरत अाहे.

       जोराच्या पावसामुळे रस्ता खचला असून खचलेल्या भागाचे व इतर डागडूजीचे काम त्वरीत सुरू करून ताबडतोब पूर्ण करणार अाहे.त्यामुळे दोन दिवसामध्ये रस्ता वाहतूकीस खुला करून देण्यात येईल.         -  एल. बी. हजारे     उपअभियंता, सार्वजनीक बांधकाम विभाग, पन्हाळा