हणमंतवाडी येथे गेली कित्येक वर्षे प्रत्येक गल्लीत व दारासमोर केलेल्या अतिक्रमणाने रहदारीला अडथळा निर्माण होत होता. गावातील रस्ते नकाशावर चाळीस फूट; पण प्रत्यक्षात दहाच फूट शिल्लक होते. सध्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व सरपंच संग्राम भापकर, उपसरपंच सरपंच तानाजी नरके, संजय जाधव यांनी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन सदरची अतिक्रमणे काढायला सुरुवात केली आहे. याला ग्रामस्थांकडून चांगला प्रसिद्ध प्रतिसाद मिळत आहे. हणमंतवाडी येथील अतिक्रमण काढल्याने येथील वाहतुकीचा प्रश्नही कायमचा निकालात निघाला आहे. गावातील मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगणही रिकामे करून देण्यात येणार असल्याचे सरपंच संग्राम भापकर यांनी सांगितले.
फोटो
: ०६ हणमंवाडी अतिक्रमण
हणमंतवाडी येथील शिंदे माळकडील रस्ता अतिक्रमणमुक्त करण्यात आला.