शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
3
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
4
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
5
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
6
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
7
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
8
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
9
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
10
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
11
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
12
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
13
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
14
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
15
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
16
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
17
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
18
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
19
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
20
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?

विकासाच्या वाटेवर

By admin | Updated: May 26, 2015 00:50 IST

शरद पवार--एनकूळ

शेखर जाधव - वडूजकेंद्र व खासदार फंडाबरोबरच खासगी संस्था आणि मोठे उद्योजक यांना माजी कृषिमंत्री, खासदार शरद पवार यांनी केलेल्या आवाहनामुळे या गावाला कोट्यवधींचा निधी उपलब्ध झाल्याने एनकूळ गावाचा कायापालट होण्यास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे कायम दुष्काळी असणारे एनकूळ अल्पावधीतच आदर्श ठरणार आहे.‘सांसद आदर्श ग्राम’ योजनेअंतर्गत विविध विभागांच्या माध्यमातून एनकूळ गावामध्ये नियोजनबद्ध विकासाचा आराखडा तयार असून, विविध कामे प्रगतिपथावर आहेत. ‘स्वच्छ भारत’ विभागाअंतर्गत शंभर टक्के कुटुंबांना वैयक्तिक शौचालय सुविधा निर्माण करणे, स्वच्छता ग्रामसभा आयोजित करणे. शौचालय नसलेल्यांना विद्यार्थ्याकडून गुलाबपुष्प देणे असे विविध विभागाकडून प्रबोधन करणे, असे उपक्रम राबवून गावात स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जात आहे. त्याचप्रमाणे मराठी सिनेअभिनेते सयाजी शिंदे व मकरंद अनासपुरे यांनीही या गावाला भेट देऊन प्रबोधन केले आहे.समाजकल्याण विभागाअंतर्गत व्यसनमुक्ती कॅ म्पचे आयोजन करून एनकूळ गावात जनजागृती केली. अपंगांची नोंदणी केली असून, लघुउद्योगासाठी शारीरिक अंपगांना अर्थसाहाय्य करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दलितवस्ती सुधार योजनांचे कामे प्रगतिपथावर आहेत. यशवंत घरकुल योजनेचा लाभ येथील ग्रामस्थांना मिळाला आहे. तसेच पाचवी ते बारावीमध्ये शिकत असलेल्या मुला-मुलांनी सायकल वाटप करण्यात आली आहे. सध्या विविध योजनांचा लाभ एनकूळ गावच्या कायापालट मोहिमेत मैलाचा दगड ठरत आहे.खासदार शरद पवार यांनी हे गाव दत्तक घेतले, असे जाहीर करताच या गावात नेमके खासदार पवार यांनी काय पाहिले, असा सवाल सर्वसामान्य नागरिकांच्या बरोबरीने ज्येष्ठ राजकीय नेत्यांना पडला. या गावातील ८० टक्के लोक सुशिक्षित व नोकरीमध्ये असले तरी विचारांची देवाण-घेवाण राजकीय गटातटात विभागल्यामुळे यापूर्वी विकास खुंटलेला होता. आता मात्र तशी परिस्थिती राहिली नाही. प्रथम गावचा विकास मग राजकारण, असा नवीन पायंडा एनकूळकरांच्यात पडल्याने चौफेर विकास साधला जात आहे.‘सांसद आदर्श ग्राम’ योजनेमुळे बदलतंय दुष्काळातील गाव...जाणीवपूर्वक खासदार शरद पवार यांनी घेतलेले एनकूळ हे दत्तक गाव.कायम दुष्काळी असणारे एनकूळ हे गाव दत्तक घेऊन खासदार पवार यांनी येथील ग्रामस्थांना व भावी पिढीला एक नवीन आर्दश निर्माण करून दिला आहे. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून भव्य इमारत येथे सुरू असून, परिसरातील तरुणांच्या शिक्षणाची गैरसोय दूर होणार आहे. - प्रा. अर्जुन खाडे, जिल्हा बँक संचालकन्याय देण्याची भूमिका खासदार पवार यांनी घेतल्याने या भागाचा कायापालट निश्चित होणार यात शंका नाही. पाणीपुरवठ्यासह या भागातील कामांना त्यांच्यामुळे ऊर्जितावस्था लाभणार आहे. - भाऊसाहेब खाडे, सरपंचपवार यांची गावभेट व लक्षप्रारंभी खासदार शरद पवार यांनी एनकूळ गावामध्ये महिन्यातून एकदा असे मिळून चारवेळा भेटी दिल्या असून, यामध्ये गावकऱ्यांशी संवाद साधून अधिकाऱ्यांच्या बैठकीही याच गावात घेऊन विकासाचा आराखडा तयार केला. देशपातळीवरचे नेते असल्याने वारंवार जरी त्यांना या ठिकाणी येता आले नसले तरी त्यांचे या गावावर पूर्ण लक्ष असल्याचे अधिकऱ्यांच्या हालचालीवरून समजते.