शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नदी म्हणजे आई, व्यक्ती, समाज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : नदी म्हणजे फक्त पाणी नव्हे, नदी म्हणजे जिवंत व्यक्ती, आपली आई व समाज होय. त्यामुळे नदी वाचविणे ही सामूहिक जबाबदारी आहे, असे मत मुंबई आय.आय.टी.चे प्रा. डॉ. श्याम असोलेकर यांनी कोल्हापुरात रविवारी व्यक्त केले.आठवा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये प्रा. असोलेकर यांना ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. आर. ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : नदी म्हणजे फक्त पाणी नव्हे, नदी म्हणजे जिवंत व्यक्ती, आपली आई व समाज होय. त्यामुळे नदी वाचविणे ही सामूहिक जबाबदारी आहे, असे मत मुंबई आय.आय.टी.चे प्रा. डॉ. श्याम असोलेकर यांनी कोल्हापुरात रविवारी व्यक्त केले.आठवा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये प्रा. असोलेकर यांना ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. आर. व्ही. भोसले यांच्या हस्ते ‘वसुंधरा’ सन्मानाने गौरविण्यात आले. त्यावेळी ते ‘नदी वाचवा - जीवन वाचवा’ या विषयावर बोलत होते. सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या सन्मानाचे स्वरूप होते. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार अध्यक्षस्थानी होते. यावेळी ‘किर्लोस्कर’चे व्हाईस प्रेसिडेंट (मार्केटिंग) संजीव निमकर, चंद्रहास रानडे, दळवीज आर्ट आॅफ इन्स्टिट्यूटचे प्राचार्य अजेय दळवी, आदींची प्रमुख उपस्थिती होती. शाहू स्मारक भवनात रात्री महोत्सवाचा समारोप झाला.श्याम असोलेकर म्हणाले, भारतात प्रमुख १४ नद्या आहेत. त्यांपैकी गंगा ही सर्वांत मोठी नदी आहे. तिचा अभ्यास मी केला आहे. नदीत प्राणी, कीटक, जंतू असतात; तसेच नदीकाठावर लोकवस्ती असते. त्यामुळे नदी म्हणजे हा एक समाज आहे. आपण २५ वर्षे पर्यावरणाचे रक्षण करतो आहे. त्यामुळे त्याच्या विकासासाठीचा हा लढा आहे. आज देशात ९० कोटी लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. येथील अर्थव्यवस्था शेतीशी निगडित आहे. सुमारे सहा लाख खेडी असून, ५३ मोठी शहरे आहेत. विशेषत: नदी प्रदूषित होण्याचे मुख्य कारण नागरी वस्तीतील घनकचरा होय.सुभेदार म्हणाले, यंदाच्या गणेशोत्सवामध्ये जिल्ह्यात चार लाख गणेश मूर्तिदान, तर १५०० ट्रॉली या निर्माल्य झाले. त्यामुळे नदी प्रदूषित होण्यापासून वाचली, याचा मला आनंद आहे. त्याचबरोबर १४४ कलम लावून डॉल्बी बंदी केला. याचे श्रेय पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जिल्हा व पोलीस प्रशासनाला जाते.संजीव निमकर यांनी, सात वर्षांपासून पर्यावरणपूरक हा विषय घेऊन हा महोत्सव राबवीत आहे. भारतभर असे कार्यक्रम कंपनीच्या वतीने करतो, असे सांगितले.यावेळी ‘सायबर’चा विद्यार्थी किशोर आरेकर, शाल्मली गोडसे व शिवाजी विद्यापीठाचा वीरेश शिवपुजे, तर युवा शास्त्रज्ञ अनिकेत कामत यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. को-आॅर्डिनेशन कमिटीचे व्हाईस प्रेसिडेंट कृष्णा गावडे यांनी प्रास्ताविक, तर पर्यावरणप्रेमी उदय गायकवाड यांनी स्वागत केले. यावेळी ‘किर्लोस्कर’चे चंद्रहास रानडे, वीरेंद्र चित्राव, प्रा. रवी निकम, आदी उपस्थित होते.