शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

आॅनलाईन माहितीच्या सक्तीत अडकली ‘रायफल’

By admin | Updated: December 10, 2014 23:55 IST

परवानाधारकांना हेलपाटे : पोलीस ठाणे, प्रांत कार्यालयातून विलंब; जिल्ह्यात ९ हजार २५४ जणांकडे शस्त्रे

भीमगोंडा देसाई - कोल्हापूर -परवानाधारक रायफल्सधारकांना ‘नॅशनल डाटाबेस फॉर आर्म्स लायसेन्स’ या सॉफ्टवेअरमध्ये पोलीस ठाण्यात जाऊन माहिती भरून देण्याची सक्ती केली आहे. त्यामुळे नूतनीकरणावेळी परवानाधारकांना हेलपाटे घालावे लागत आहेत. नूतनीकरणाचे अधिकार प्रांताधिकारी यांना दिले आहेत. आॅनलाईन माहिती भरून आयडी क्रमांक मिळाल्याशिवाय प्रांताधिकारी कार्यालयात नूतनीकरण करून दिले जात नाही. परवानाधारकांची नूतनीकरणावेळीच कोंडी करून आॅनलाईन माहिती भरून घेण्याची संधी महसूल विभागाने हेरली आहे. परिणामी माहितीच्या सक्तीमुळे रायफल्सचे नूतनीकरण अडत आहे. नेमबाजी, स्वसंरक्षण, औद्योगिक आणि बँकांमधील बंदोबस्त या कारणांसाठी रायफल्स, डीबीबीएल, एसबीबीएल बाळगतात. जिल्ह्यातील ९ हजार २५४ जणांकडे ही शस्त्रे जवळ ठेवण्याचा अधिकृत परवाना आहे. या सर्वांनी संबंधित पोलीस ठाणे आणि महसूल विभागाकडून रीतसर परवाना घेतला आहे. रिव्हॉल्व्हर प्रत्येक वर्षी, तर डीबीबीएल, एसबीबीएल यांचे तीन वर्षांनी नूतनीकरण करणे बंधनकारक आहे. परवानाधारकांची सोय व्हावी व जिल्हाधिकारी कार्यालयातील कामांचा ताण कमी व्हावा, यासाठी ४ आॅक्टोबर २०१४ पासून जिल्ह्यातील प्रांताधिकारी यांना नूतनीकरण करण्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे परवानाधारकास नूतनीकरणासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांऐवजी आपल्या कार्यक्षेत्रातील प्रांताधिकारी कार्यालयात जावे लागणार आहे. हा निर्णय चंदगड, भुदरगड, आजरा, पन्हाळा या जिल्ह्यापासून लांब असलेल्या तालुक्यातील परवानाधारकांना सोयीचा होत आहे. स्वसंरक्षणासाठी शस्त्रपरवाना असल्यास परवानाधारकाचे नाव, जन्मतारीख, लिंग, व्यवसाय, पालक किंवा पत्नीचे नाव, देश, जन्म ज्या राज्यात झाला त्याचा तपशील, फोन, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, सध्याचा पत्ता, नजीकचे पोलीस ठाणे, कायमचा वास्तव्याचा पत्ता; तर शस्त्र खेळासाठी घेतले असल्यास परवाना क्रमांक, परवाना दिल्याची तारीख, वैधता दिनांक, परवान्याचे कार्यक्षेत्र; तसेच ते बँक आणि औद्योगिक प्रकल्पातील बंदोबस्तासाठी घेतले असल्यास एकूण मंजूर हत्यारांची संख्या, बोअर, आदी माहिती पोलीस ठाण्यात आॅनलाईन भरून द्यावी लागणार आहे. माहिती भरून दिल्यानंतर आयडी क्रमांक दिला जाणार आहे. आयडी क्रमांक घेऊन प्रांताधिकारी कार्यालयात जाऊन परवाना नूतनीकरण करून घ्यावा लागणार आहे. प्रशासनाची ‘आयडिया’ एकदा परवाना मिळाल्यानंतर रायफलधारक, डीबीबीएल, एसबीबीएल धारकांना प्रशासनाची आठवण राहत नाही. नूतनीकरणावेळीच ते पुन्हा प्रशासनाकडे येतात. इतर वेळी पत्रव्यवहार केला तरी फिरकत नाहीत. म्हणून प्रशासनाने यावेळी नूतनीकरणावेळी पोलीस ठाण्यात आॅनलाईन माहिती भरून देणे बंधनकारक केले आहे. केंद्र शासनाच्या गृह विभागाच्या आदेशानुसार ही माहिती भरून घेतली जात आहे. शासनाच्या आदेशानुसार शस्त्र नूतनीकरणावेळी पोलीस ठाण्यात आॅनलाईन माहिती भरून घेतली जात आहे. परवानाधारकांच्या सोयीसाठी नूतनीकरणाचे अधिकारही प्रांताधिकारी यांना दिले आहेत. - राजाराम माने, जिल्हाधिकारी परवानाधारकांना प्रांताधिकारी यांच्याकडे नूतनीकरणासाठी पाठविणे म्हणजे जबाबदारी टाळण्याचा प्रकार आहे. चारित्र्य पडताळणी दाखल्यासाठी पोलीस ठाण्यात १०० रुपयांची पावती करावी लागते.- प्रशांत वेल्हाळ, परवानाधारक