शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकांचा मोर्चा

By admin | Updated: February 17, 2016 01:20 IST

‘आरटीओ’ कार्यालय : परवाना शुल्कवाढ रद्द करा; कोल्हापुरी हिसका दाखविण्याचा इशारा

कोल्हापूर : रिक्षा परवाना नूतनीकरण शुल्कवाढ विरोधी रिक्षाचालकांनी लढा पुकारला असून, मंगळवारी दुपारी जिल्ह्यातील रिक्षाचालकांनी रिक्षांसह येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयावर (आरटीओ) विराट मोर्चा काढून शक्तिप्रदर्शन केले. राज्य शासनाने ही दरवाढ रद्द करावी, रिक्षाचालकांवर कारवाई केल्यास रिक्षा जाग्यावरच रस्त्यावर थांबवून ‘कोल्हापुरी हिसका’ दाखवू, असा इशाराही यावेळी दिला. रिक्षांनी कार्यालयाला घेराव घातल्याने परिसरातील वाहतूक ठप्प झाली होती. परिसरात चालकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिष्टमंडळाच्यावतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांना निवेदन देण्यात आले. राज्य शासनाने रिक्षा परवाना नूतनीकरण शुल्कामध्ये केलेल्या अन्यायी दरवाढ निर्णयाविरुद्धचा लढा तीव्र करण्याचा निर्धार कोल्हापुरातील सर्व रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत घेतला होता. त्यानुसार मंगळवारी दुपारी येथील सासने मैदानावर कोल्हापूर शहर, इचलकरंजी, जयसिंगपूर, गडहिंग्लज, चंडगड येथील रिक्षाचालक एकत्र आले तेथून रिक्षासह मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चा आदित्य कॉर्नरमार्गे प्रादेशिक परिवहन कार्यालयावर पोहोचला तेथे रिक्षाचालकांनी कार्यालयाला घेरावो घालून रस्ता रोको केला. ‘अन्यायी दरवाढ रद्द करा’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. आंदोलकांनी शंखध्वनी केला. रिक्षाचालकांच्या मोर्चाला प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर अडविला. त्यानंतर हे मुख्य प्रवेशद्वार उघडून सर्व रिक्षाचालक मुख्य इमारतीत घुसले. कार्यालयाच्या मुख्य इमारतीच्या हॉलमध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांनी रिक्षाचालकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. रिक्षाचालकांनी मागण्यांचे निवेदन देताना, ही दरवाढ रद्द न केल्यास दि. १ मार्चपासून या राज्यभर आंदोलन करण्यात येणार असून त्याची ठिणगी कोल्हापुरात पडल्याचे सांगितले. एखाद्या रिक्षावर जरी कारवाई केली तर सर्व रिक्षा रस्त्यांवरच थांबविण्याचा व कोल्हापुरी हिसका दाखविण्याचा असा इशारा यावेळी चालकांनी दिला. चर्चेवेळी राजेंद्र वर्मा यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करताना, राज्य शासनाने घेतलेला हा धोरणात्मक निर्णय असल्याने त्याबाबत रिक्षाचालकांच्या भावना शासनास कळवू, असे सांगितले. या शिष्टमंडळात, महाराष्ट्र रिक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष राजू जाधव, चंद्रकांत भोसले, न्यू करवीर रिक्षा युनियनचे अध्यक्ष सुभाष शेटे, ताराराणी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष गौरीशंकर पंडित, चालक-मालक रिक्षा संघटनेचे राजू पाटील, कोल्हापूर जिल्हा रिक्षा व्यवसाय संघटनेचे मोहन बागडी, कॉमन मॅन संघटनेचे अविनाश दिंडे, आदर्श युनियनचे ईश्वर चन्नी, भाजप रिक्षा संघटनेचे विजय गायकवाड, जयसिंगपूर अ‍ॅटो रिक्षा युनियनचे अध्यक्ष मौला पटेल, सागर सूर्यवंशी तसेच अरुण घोरपडे, दिलीप सूर्यवंशी, अरुण शिंदे, दत्तात्रय जाधव, भास्कर भोसले, विजय जेधे, किशोर कांबळे, प्रशांत रेडे, केशव माने, तसेच विद्यार्थी वाहतूक संघटनेचे शिवाजी पाटील, हिंदुस्थान आॅटो रिक्षा संघटनेचे वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)वाहतुकीची कोंडीया मोर्चामध्ये सुमारे एक हजाराहून अधिक रिक्षा सहभागी झाल्याने मार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती, तर कार्यालयाच्या आवारात सुमारे दोन तास रास्ता रोको व घेराव घातल्याने परिसरात वाहतूक ठप्प झाली होती, तसेच ‘आरटीओ’ कार्यालयातील कामकाज कोलमडले होते.