शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत रिक्षाचालकांत संघर्ष

By admin | Updated: June 29, 2015 00:22 IST

टप्पा वाहतूक : परस्परांवर कारवाईसाठी पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन

मिरज : मिरजेत टप्पा वाहतुकीवरून तीन आसनी व पॅगो रिक्षाचालकांत संघर्ष निर्माण झाला आहे. परस्परांवर कारवाईसाठी दोन्ही रिक्षाचालकांच्या संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा अवमान करून मिरज-सांगली रस्त्यावर पॅगो रिक्षाची टप्पा वाहतूक सुरू असल्याने रिक्षांवर कारवाईसाठी तीन आसनी रिक्षाचालकांच्या जय भारत रिक्षा संघटनेने आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. मिरज शहरात बसस्थानक, रेल्वेस्थानक, मार्केटपासून टप्पा वाहतूक सुरू आहे. मिरज शहरात पॅगो रिक्षासाठी वेगळे थांबे दिलेले नाहीत. तरीही पॅगोचालक मार्केट, रेल्वेस्थानक, बसस्थानक, मिशन हॉस्पिटल या ठिकाणी बेकायदेशीर रिक्षा थांबे निर्माण करून टप्पा वाहतूक करीत असल्याची तीन आसनी चालकांची तक्रार आहे. टप्पा वाहतूक करणाऱ्या पॅगो रिक्षांवर कारवाईच्या मागणीसाठी आठ दिवसात आंदोलन करणार असल्याचे जय भारत संघटनेचे शरीफ काझी, मुबारक कोरबू, समीर सय्यद, इम्तियाज मुल्ला यांनी वाहतूक नियंत्रण शाखेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. महापालिका क्षेत्रात फक्त पॅगो रिक्षाच नव्हे, तर तीन आसनी रिक्षांतून मोठ्याप्रमाणात टप्पा वाहतूक सुरू आहे. कुपवाड, सांगली, मिरज, अंकली, माधवनगर, बुधगाव, हरिपूर या मार्गावर तीन आसनी रिक्षाचालकांकडून टप्पा वाहतूक करण्यात येत आहे. जिल्ह्यात टप्पा वाहतूक करणाऱ्या दोन हजार वाहनांवर कारवाई झाल्यास या सर्वांवर उपासमारीची वेळ येणार आहे. तीन आसनी रिक्षाचालक मीटरप्रमाणे भाडे न घेता जादा भाडे घेऊन प्रवाशांची लुबाडणूक करीत असल्याची पॅगो रिक्षाचालकांची तक्रार आहे. पॅगो व तीन आसनी रिक्षास एकच प्रवासी परवाना असताना, दोन्ही रिक्षांना वेगळे नियम लावता येणार नाहीत. जिल्ह्यात आठ हजार रिक्षांचा परवाना असताना रिक्षांची संख्या त्यापेक्षा दुप्पट आहे. विनापरवाना रिक्षाचालकांवर कारवाई करावी, पॅगो रिक्षांना थांब्यावर थांबून भाडे करण्यास परवानगी द्यावी, तीन आसनी, पॅगो व इतर सर्व प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी, पॅगो रिक्षांवर अन्यायी कारवाई करण्यात येऊ नये, असे अ‍ॅपे रिक्षा संघटनेचे महेश चौगुले, रफिक जमादार, रियाज आवटी, बंडू तोडकर यांनी निवेदनात म्हटले आहे. (वार्ताहर)