शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘श्रीमंत’ कोल्हापूरच्या पोकळ बाताच!

By admin | Updated: October 29, 2015 00:46 IST

उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा : तुमचीच तिजोरी रिकामी, मग देणार काय? ; मतं मागताना फसवू नका

कोल्हापूर : ‘महापालिकेची सत्ता द्या, तिजोरी भरून देऊ, असं मुख्यमंत्री म्हणतात; पण ज्यांची तिजोरीच रिकामी आहे, ते कोल्हापूरला काय देणार? असा सवाल करत, निदान मतं मागायला येताना तरी जनतेला फसवू नका,’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री येथील जाहीर सभेत भाजपला टोला लगावला. शिवसेनेबरोबरची पंचवीस वर्षांची युती तोडणाऱ्या भाजपबरोबर केवळ जनतेच्या हितासाठी राज्यात सत्तेत सहभागी आहे, सत्तेसाठी आम्ही लाचारीमुळे नाही, असा इशाराही ठाकरे यांनी यावेळी भाजपला दिला. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ येथील पेटाळा मैदानावर आयोजित केलेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. या सभेत ठाकरे यांनी भाजपला खडे बोल सुनावले शिवाय राष्ट्रवादी व काँग्रेसच्या कार्याचा पंचनामाही केला. सुमारे पंचेचाळीस मिनिटांच्या आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला. शिवसेना हा दिलेला ‘शब्द’ पाळणारा पक्ष आहे म्हणून मी जे बोलेन ते करीन आणि जर का दिलेला ‘शब्द’ पाळला नाही तर पुन्हा कोल्हापूरला येणार नाही. मागच्या विधानसभा निवडणुकीवेळीही आम्ही काही वचने दिली; परंतु राज्यात शिवसेनेची पूर्ण सत्ता आली नाही. याबद्दल जळफळाट जरी नसला तरी चांगली कामे कशी होतील यादृष्टीने प्रयत्न करत आहोत. आम्ही सत्तेशी बांधील नाही तर जनतेशी बांधील आहोत म्हणूनच पुन्हा कोल्हापूरला येईन तर तो शिवसेनेचा महापौर घेऊनच येईल, असे ठाकरे म्हणाले. भाजपवर आज खरंतर बोलावे की नको, बोलायचं नाही असं ठरविले की अंगावर येते आणि अंगावर आले की मग पंजा मारावाच लागतो, शेवटी ही शिवसेना ही वाघाची औलाद आहे. शिवसेनेबरोबरची युती कोणी तोडली, याचा खुलासा एकनाथ खडसेंनी केला आहे. हिंदुत्वासाठी गेल्या पंचवीस वर्षांपासून असलेली युती कोणी तोडली, कोणत्या कारणांसाठी तोडली, हे आता जनतेला कळाले आहे. आमचा गुन्हा तो काय होता? पंचवीस वर्षांपूर्वी राजकारणातील अस्पृश्य असणाऱ्या भाजपला बाळासाहेबांनी स्वीकारले. कोणी जवळ करायला तयार नव्हते. चांगले दिवस येतील असे वाटले होते; पण पंचवीस वर्षांनंतर तुम्हाला हिंदुत्व नको झाले. शिवसेना नको झाली आणि तिकडे काश्मिरात पाकचे झेंडे भारतीय भूमीवर फडकाविणारे मुक्ती महंमद सईद तुम्हाला चालतात. त्याची तुम्हाला लाज वाटत नाही. आम्ही जनेच्या हितासाठी सत्तेत आहे. भीकेसाठी वाडगा घेऊन आलेलो नाही. तुम्हाला शिवसेना नको ना मग काय व्हायचं ते एकदा होऊ द्या, अशा आव्हानात्मक भाषेत ठाकरे यांनी भाजपचा पाणउतारा केला. ज्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी कोल्हापूरकरांवर टोल लादला, अशांना सोबत स्थापन झालेल्या ताराराणी आघाडीच्या मांडीला मांडी लावून भाजप निवडणूक लढवत आहे. मांजर डोळे मिटून दूध पित असले तरी जगाचे त्याच्याकडे लक्ष असते. टोलचे समर्थन करणाऱ्यांना बरोबर घेऊन निवडणूक लढवायची आणि व टोल रद्द करू म्हणायचे हे फसवायचे बंद करा, असेही ते म्हणाले. गेल्या दहा वर्षांत ज्यांनी कोल्हापूरला सडवले त्या काँग्रेस, राष्ट्रवादीची मटकी डोक्यावर घ्यायची का हे ठरवा, मटकेवाल्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेल्यांनी स्वीकारायचे का ते पहा, असे आवाहनही त्यांनी केले. संकटांच्या छाताडावर चालून जाण्याची हिंमत शिवसैनिकांमध्ये आहे. शिवसैनिक या निवडणुकीत एकटा लढतोय ही संधी आहे. भ्रष्टाचाराने बरबटलेल्यांना घरी घालवा, असेही ठाकरे म्हणाले. महाडिक हे पत्त्याच्या खेळातील जोकर‘मटके’वाल्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या आमदार महादेवराव महाडिक यांची छत्रपती ताराराणीचे नाव घेण्याची लायकी तरी आहे का..? ज्या रणरागिणीने औरंगजेबालाही अखेरपर्यंत झुंजविले, तिचे नाव तुमच्या तोंडी शोभत नाही. तुम्ही तर पत्त्याच्या खेळातील जोकर आहात, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी येथे झालेल्या प्रचारसभेत केली. ठाकरे म्हणाले, ‘जुगाराच्या डावात जसा जोकर सगळीकडे चालतो तसे तुमचे राजकारण आहे. आपण एका पक्षात, मुलगा दुसऱ्या पक्षात आणखी कोण तिसऱ्या पक्षात. कुणीही निवडून आले तरी गल्ला आमचाच भरणार. कोल्हापूरची जनता अशांना निवडून तरी कशी देते..?पालकमंत्री म्हणजे ‘लबाड लांडगं’ : क्षीरसागरकोल्हापूर : गेली पंचवीस वर्षे शिवसेनेचे भरपूर सहन केले म्हणणारे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणजे ‘लबाड लांडगं ढॉँग करतंय’ अशी जहरी टीका आमदार राजेश क्षीरसागर यांनी बुधवारी रात्री येथे केली. एका बाजूला पालकमंत्री एकमेकांवर टीका करू नये असे आवाहन करतात आणि दुसऱ्या बाजूला एक ‘खुळं’ माझ्यावर टीका करीत आहे, अशी बोचरी टीकाही त्यांनी भाजपचे महेश जाधव यांच्यावर नाव न घेता केली. मटकेवाल्यांना ठोकून काढा म्हणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती घेऊन व विचार करून बोलावे; कारण भाजप-ताराराणी आघाडीचे उमेदवार हे मटकेवाले, दारूवाले आहेत. तसेच टोल आणणाऱ्यांना हद्दपार करा, अशी वल्गना करणाऱ्या महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी भाजप-ताराराणी आघाडीने ज्यांना उमेदवारी दिली आहे, त्यातील काहीजण हे २००५ च्या सभागृहात नगरसेवक असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही पालकमंत्री यांच्यावर सडकून टीका केली. पालकमंत्री ज्या भागात राहतात त्या प्रभागाला स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला आहे; परंतु शहरात मात्र लोकांना प्रातर्विधीसाठी उघड्यावर बसावे लागते, हे दुर्दैव आहे. पालकमंत्री एकीकडे वाद थांबवा म्हणतात आणि दुसरीकडे काहीतरी बरळतात. यावरून त्यांना शिवसेनेच्या वैचारिक मतभेदांचा ‘अटॅक’ आल्याचे दिसते, अशी टीका गोऱ्हे यांनी केली. डॉ. शिवरत्न शेटे यांनी शिवसेना हा अठरापगड जातींचा पक्ष असल्याचे सांगून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या जातीच्या लोकांना आमदार केल्याचे सांगितले. जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, शिवसेनेने सत्तेसाठी कुणाशी हातमिळवणी केलेली नाही. त्यामुळे सर्वच प्रभागांत उमेदवार पक्षाने उमेदवार उभे केले असून ती धमक फक्त शिवसेनेतच आहे. आमदार डॉ. सुजित मिणचेकर, चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील-सरुडकर यांनीही आपल्या भाजपसह कॉँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. ...यांनाही ठोकून काढामटकेवाल्यांना ठोकून काढा, असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी पहिल्यांदा आपल्या पक्षाच्या राजलक्ष्मी नगरातील महिला उमेदवारांचे मटकेवाले पती दत्ता बामणे यांना ठोकून काढावे, असा टोला आमदार क्षीरसागर यांनी यावेळी हाणला.