शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘रेरा’तील जाचक अटी रद्द करा -- अविनाश पाटील

By admin | Updated: June 11, 2016 00:28 IST

घर बुकिंगनंतर दोन वर्षांत ताबा बंधनकारक केले. यात दंडात्मक केलेली तरतूद आम्हाला मान्य नाही. ही अट लागू करायची असेल तर परवाने देण्यास विलंब करणाऱ्या सरकारी यंत्रणेलाही यात दोषी धरा.

कोल्हापूर : सरकारने बांधकाम व्यावसायिकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केलेल्या ‘रिअल इस्टेट रेग्युलटरी अ‍ॅक्ट’ अर्थात ‘रेरा’चे स्वागत करू. मात्र, या कायद्यातील जाचक तरतुदींना आपला विरोध कायम राहील. ग्राहकाला दोन वर्षांत घराचा ताबा देण्याच्या अटीवर सरकारने विचार करावा, असे प्रतिपादन बिल्डर्स असोसिएशन आॅफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले.असोसिएशनच्या कोल्हापूर शाखेतर्फे शुक्रवारी येथे आयोजित पहिल्या राज्यस्तरीय परिषदेची बैठक झाली. त्याप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.पाटील म्हणाले, सरकार कायदे करताना त्यांची अंमलबजावणी मागील काही वर्षांपासून करते. त्यामुळे अडचणी निर्माण होतात. सरकारकडून कामगारांकरिता पीपीएफ व ईएसआयसी; रेरा आणि सेवा कर हे चारीही आम्ही स्वीकारले आहेत. त्यात प्रत्येक वेळी बांधकामांना परवानगी देतानाच सेसही कापून घेतला जातो. मात्र, प्रत्यक्षात कामगारांना त्याचा लाभ मिळत नाही. ‘ईएसआयसी’चे पैसे सरकार कापून घेते; मात्र त्यांची रुग्णालये काही ठिकाणी नाहीत. त्याचा फायदा कामगारांना मिळत नाही. आता रेरा कायद्यांतर्गत बांधकाम कंत्राटदार येत आहेत. घर बुकिंग केल्यानंतर दोन वर्षांत ग्राहकाला ताबा देणे बंधनकारक केले. यात दंडात्मक केलेली तरतूद आम्हाला मान्य नाही. ही अट लागू करायची असेल तर परवाने देण्यास विलंब करणाऱ्या सरकारी यंत्रणेलाही यात दोषी धरा.असोसिएशनचे विश्वस्त शंकरभाई देसाई म्हणाले, सध्या अनधिकृत बांधकामेही मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहेत. याला सरकारच जबाबदार आहे; कारण एखादे कंत्राटदार, ग्राहक यांना वर्षानुवर्षे परवाने मिळत नाहीत. त्या-त्या कार्यालयाचे हेलपाटे मारून ही मंडळी अक्षरश: थकतात. त्यातूनच मग अनधिकृत बांधकामे वाढत आहेत. सरकारने येत्या २०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याचे स्वप्न दाखविले आहे. मात्र, सध्याची बांधकामांची गती पाहता वर्षाला केवळ आठ लाख घरे बांधता येतील, अशी परिस्थिती आहे. केंद्र सरकारने ३० व ६० चौ.मी. घरे उभारल्यास मुद्रांक शुल्क व प्राप्तीकर माफ करू असे सांगितले आहे. मात्र, प्रत्यक्षात हा लाभ द्यायला राज्य सरकार तयार नाही. जमिनीची मर्यादा लक्षात घेता ‘उभी वाढ पद्धती’ अर्थात हॉरिझॉँटल डेव्हलपमेंटला परवानगी देणे आवश्यक आहे. जमिनीची मर्यादा असल्याने किमान २५ मजले इमारती बांधण्यासाठी परवानगी द्यावी. यात अनेक कुटुंबांना घरे मिळतील. राज्य अध्यक्ष सुरेश पाटील म्हणाले, बांधकाम परवाना देताना ‘लेबर सेस’ म्हणून कापून घेतलेला पैसा तसाच पडून आहे. यातील २० टक्के रक्कम कामगारांच्या कल्याणासाठी द्यावी. यात केंद्राचे २४ हजार कोटी, तर राज्याचे ३ हजार ६०० कोटी रुपये पडून आहेत. यावेळी राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे नोंदणी, रेरा कायदा, सेवा कर, अर्बिट्रेशन, महापालिका क्षेत्रातील बांधकाम परवाने, आदींबाबत चर्चा झाली. यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष राजीव कृष्णानी, विश्वस्त विजय देवी, कोल्हापूर शाखाध्यक्ष प्रताप कोंडेकर, उपाध्यक्ष सोपान पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)