शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनातील गुन्हे मागे घ्या:संभाजीराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 00:50 IST

< p >कोल्हापूर : मराठा आरक्षणासंदर्भातील घटनादुरुस्तीचा विषय संसदेत येऊ दे, त्यावेळी बघा, मी दिल्ली हलवून सोडतो, हे मी राजर्षी शाहूंची शपथ घेऊन सांगतो, अशी ग्वाही खासदार संभाजीराजे यांनी रविवारी येथे दिली. मराठा आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे सरकारने मागे घ्यावेत, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी दिला.दसरा चौकात मराठा आरक्षणाच्या ...

<p>कोल्हापूर : मराठा आरक्षणासंदर्भातील घटनादुरुस्तीचा विषय संसदेत येऊ दे, त्यावेळी बघा, मी दिल्ली हलवून सोडतो, हे मी राजर्षी शाहूंची शपथ घेऊन सांगतो, अशी ग्वाही खासदार संभाजीराजे यांनी रविवारी येथे दिली. मराठा आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे सरकारने मागे घ्यावेत, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी दिला.दसरा चौकात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फेबेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. रविवारी सहाव्या दिवशी खासदार संभाजीराजे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा देत रोखठोक भूमिका मांडली. यावेळी दिलीप देसाई, वसंतराव मुळीक, फत्तेसिंह सावंत, अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे, सचिन तोडकर, हर्षल सुर्वे, प्रसाद जाधव, विनायक फाळके, संदीप पाटील, उमेश पोवार, हेमंत साळोखे, संजय पोवार, गणी आजरेकर व्यासपीठावर उपस्थित होते.संभाजीराजे म्हणाले, माझी खासदारकी ही बहुजन समाजासाठी असून, या पदाची शपथ घेतल्यानंतर कोपर्डीसह मराठा आरक्षणावर आपण भूमिका मांडली आहे. सध्या मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. ते शांततेत सुरू असून, अद्याप आपण हातात काठी घेतलेली नाही. सरकारकडून निर्णयाची वाट पाहत आहोत. त्यांनी आम्हाला गृहीत धरू नये. आंदोलनाचे नेतृत्व कोणत्याही परिस्थितीत आपण करणार नाही, तर संपूर्ण समाजच याचे नेतृत्व करील. त्यामागे आपण राहू.ते पुढे म्हणाले, सरकारने आंदोलनादरम्यान आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत; कारण ते गुन्हेगार नसून समाजाच्या मागण्यांसाठी लढत आहेत. हे गुन्हे जर मागे घेतले नाहीत तर आपण स्वत: रस्त्यावर उतरू. आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वपक्षीय लोक एकत्र येत आहेत, हे आनंददायी आहे.आत्ताच मराठाखासदारांनी तोंड उघडलेमराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वप्रथम संसदेत आपण आवाज उठविला, त्यावेळी एकाही मराठा खासदाराने तोंड उघडले नाही. आता मात्र जो-तो बोलत आहे, असा टोला संभाजीराजे यांनी लगावला.माझे तीन विरोधकसंभाजीराजे यांनी आपल्या भाषणात माझे तीन विरोधक या व्यासपीठावर आहेत, असे म्हणताच उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. त्यावर पुढे भाषण सुरू ठेवत आपण या विरोधकांना फोन करून काय केले पाहिजे, असे विचारले.