शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मतदार याद्यांचे गुरुवारपासून पुनरीक्षण

By admin | Updated: October 5, 2015 00:49 IST

अमित सैनी यांची माहिती : ११ व १८ आॅक्टोबरला विशेष मोहीम; नवमतदार नोंदणी ७ नोव्हेंबरपर्यंत

कोल्हापूर : भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार १ जानेवारी २०१६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत गुुुरुवारी (दि. ८) प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी केली जाणार असून, या दिवसापासून हा कार्यक्रम जिल्ह्णात राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. नवमतदार नोंदणीसाठी ७ नोव्हेंबरपर्यंत मुदत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.सैनी म्हणाले, छायाचित्र मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार गुरुवारी प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी, गुरुवार (दि. ८) ते ७ नोव्हेंबर - दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी, १४ आॅक्टोबर रोजी मतदार याद्यांमधील संबंधित ग्रामसभा, स्थानिक संस्थांत वाचन व नावांची खातरजमा करणे, ११ व १८ आॅक्टोबर या दोन दिवशी विशेष मोहीम, ३० नोव्हेंबरपर्यंत दावे व हरकती निकालात काढणे, २४ डिसेंबरपर्यंत डाटाबेसचे अद्ययावतीकरण आणि १६ जानेवारी २०१६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल.ते पुढे म्हणाले, जिल्ह्णातील मृत, दुबार व स्थलांतरित मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याने मतदारांनी आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट असल्याची खात्री करावी. मतदारांनी त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे मतदान मदत केंद्रावर फॉर्म भरून द्यावेत. मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी फॉर्म ६, मतदार यादीतील नावास आक्षेप घेण्यासाठी किंवा नाव वगळण्यासाठी फॉर्म ७, मतदार यादीतील नोंदीच्या तपशिलामध्ये करावयाच्या दुरुस्तीसाठी फॉर्म ८ आणि मतदार यादीतील नोंदीचे स्थानांतर करण्यासाठी फॉर्म ८ अ मतदान मदत केंद्रांवर मिळतील.या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मतदान मदत केंद्र कार्यान्वित केल्या आहेत. विशेष मोहिमेदिवशी सर्व मतदान नोंदणी अधिकारी व सहायक मतदान नोंदणी अधिकारी उपस्थित राहतील; तसेच या मतदान केंद्रांवर सर्व फॉर्म मिळतील. विशेष मोहीम काळात मतदान केंद्रांवर उपस्थित न राहणाऱ्या मतदान नोंदणी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संगीता चौगुले, तहसीलदार रामहरी भोसले उपस्थित होते. (प्रतिनिधी)जिल्ह्यात २९ लाख मतदार२१ जानेवारी २०१५ रोजी प्रसिद्ध केलेल्या अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्णातील १० विधानसभा मतदार संघात २९ लाख २८ हजार ८८३ इतके मतदार आहेत. यामध्ये १५ लाख १३ हजार ७०६ महिला मतदार, १४ लाख १५ हजार ११७ पुरुष मतदार आणि ६० इतर मतदारांचा समावेश आहे. विधानसभानिहाय मतदार संख्या अशी - चंदगड - ३ लाख ३२, राधानगरी- ३ लाख ६ हजार, ६११, कागल- २ लाख ९९ हजार ८५१, कोल्हापूर दक्षिण- ३ लाख १२ हजार २९, करवीर- २ लाख ९० हजार ४५३, कोल्हापूर उत्तर- २ लाख ८५ हजार ८०३, शाहूवाडी- २ लाख ६६ हजार ८२६, हातकणंगले- ३ लाख ४ हजार ९४०, इचलकरंजी- २ लाख ७१ हजार २५०, शिरोळ- २ लाख ९१ हजार ८८.हा कार्यक्रम महापालिका निवडणुकीशी निगडित नाहीमतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम हा कोल्हापूर महानगरपालिकेसाठी होत असलेल्या निवडणूक कार्यक्रमांशी निगडित नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी स्पष्ट केले. १६ जानेवारी २०१६ रोजी प्रसिद्ध होणारी अंतिम मतदार यादी ही सन २०१६ व २०१७ मध्ये सुरुवातीच्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मूळ मतदार यादी म्हणून वापरण्यात येणार असल्याचे आयोगाने कळविल्याचेही त्यांनी सांगितले.राजकीय पक्षांनी योगदान द्यावेपत्रकार परिषदेपूर्वी मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत जिल्ह्णातील राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचीही विशेष बैठक जिल्हाधिकारी सैनी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या संपूर्ण कार्यक्रमाबाबत त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना या कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. हा कार्यक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी दिलीप पवार, चंद्रकांत यादव, आदी उपस्थित होते.