शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित : मराठा स्वराज्य भवनचा प्रश्न सहा महिन्यात मार्गी लावू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जागेच्या बाबतीत सुधारीत प्रस्ताव तयार असून येत्या सहा महिन्यांत मराठा स्वराज्य भवनचा प्रश्न मार्गी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जागेच्या बाबतीत सुधारीत प्रस्ताव तयार असून येत्या सहा महिन्यांत मराठा स्वराज्य भवनचा प्रश्न मार्गी लागेल, अशी ग्वाही आमदार चंद्रकांत जाधव यांनी दिली. हे भवन मंगलकार्य नव्हे ते शिक्षण, प्रशिक्षणाचे केंद्र ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मराठा वार्षिक दिनदर्शिकेच्या २२ व्या अंकाचे प्रकाशन शुक्रवारी सायंकाळी शाहू स्मारक भवनमध्ये झाले. त्यावेळी ते बोलत होते. निवृत्त पोलीस अधिकारी पंढरीनाथ मांढरे, मराठा महासंघाचे नेते वसंतराव मुळीक प्रमुख उपस्थित होते.

आमदार जाधव म्हणाले, ‘सारथी’च्या सक्षमीकरणात माझा हातभार राहिला हे मी माझे भाग्य समजतो. येथून पुढे देखील समाजाच्या पाठीशी ठामपणे उभा राहीन. आरक्षणाचा लढा न्यायालयात आहे, येथे सक्षमपणे बाजू मांडण्यासाठी आरक्षणावरून समाजातील दोन प्रवाहांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. राज्य सरकार यासंदर्भात लवकरच दिल्लीत बैठक घेत आहे, पण हा प्रश्न केंद्र सरकारने मनात आणला तर लगेच सुटू शकतो, त्यामुळे केंद्र सरकारने भूमिका घ्यावी, यासाठी संघटितपणे पाठपुरावा करण्याची गरज आहे.

निवृत्त पोलीस अधिकारी मांडरे यांनी बिंदू नामावलीनुसारच आरक्षण मिळाले पाहिजे. एकूण ४९ टक्के मागासवर्गीय आरक्षण असताना आणि ५१ टक्के खुले असतानाही मागासवर्गीय खुल्या प्रवर्गात शिरकाव करतात. हे थांबविले तर मराठ्यांना स्वतंत्र आरक्षणाची कधी मागणीच करावी लागणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली. मुळीक, चंद्रकांत चव्हाण, सुरेंद्र घोरपडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक उत्तम जाधव यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. प्रदीप पाटील यांनी केले. आभार शैलजा भोसले यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. संदीप पाटील, डॉ. भरत कोटकर, अनंत म्हाळुंगेकर, संजय जाधव, अवधूत पाटील, कृष्णाजी हारूगडे उपस्थित होते.

(फोटो : आदित्य : अजून आलेला नाही, पाठवतो.)