शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लजला महालक्ष्मी यात्रेचा आढावा

By admin | Updated: April 1, 2015 00:01 IST

डिजीटलमुक्त यात्रेचा निर्धार : शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार

गडहिंग्लज : येथील श्री महालक्ष्मीची १५ वर्षांनी होणारी यात्रा सुरळीत पार पाडावी यासाठी यापुढे दर शुक्रवारी तयारीच्या आढाव्याची बैठक घेतली जाईल. संबंधितांनी कर्तव्यभावनेने बैठकीला उपस्थित रहावे, अशी सूचना तहसीलदार हनुमंत पाटील यांनी दिली.मेमध्ये होणाऱ्या महालक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर यात्रा समिती व प्रशासनाची आढावा बैठक पंचायत समितीच्या सभागृहात झाली. अध्यक्षस्थानी तहसीलदार पाटील होते. यात्रा डिजीटलमुक्त करण्यासह विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली.यात्रा कालावधीत महिलांसाठी १३०, तर पुरुषांसाठी ११९ शौचालयांची व्यवस्था करण्यात आली असून, अन्य ठिकाणांहून काही मोबाईल टॉयलेट मागविले जाणार आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी तानाजी नरळे यांनी दिली.यात्रेपूर्वी १५ दिवस आधी शहरात स्वच्छता मोहीम हाती घेतली जाईल. त्यासाठी बाहेरून शंभर कर्मचारी मागविण्यात आले आहेत, अशी माहिती नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे निरीक्षक रमेश मुन्ने यांनी दिली. पाणीपुरवठ्यासाठीही पर्यायी कर्मचारी तैनात ठेवण्याची सूचना तहसीलदारांनी दिली.प्राथमिक आरोग्य केंद्राकडील तालुक्यातील रुग्णवाहिका यात्रा कालावधीत गडंिहंग्लजमध्ये उपलब्ध ठेवण्याबरोबरच आवश्यक औषधांचा साठा ठेवण्याचे आदेश तहसीलदारांनी आरोग्य खात्याला दिला.शहरातील सर्व तरुण मंडळे व नागरिकांच्या बैठका घेतल्या जात आहेत. यात्रा डिजीटलमुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन यात्रा समिती अध्यक्ष रमेश रिंगणे यांनी केली. यात्रा काळातील सुरक्षेबाबतच्या उपाय योजनांची माहिती पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांनी दिली. चर्चेत नगराध्यक्ष लक्ष्मी घुगरे, गटविकास अधिकारी चंचल पाटील, यात्रा समिती उपाध्यक्ष विठ्ठल भमानगोळ, चंद्रकांत सावंत, बसवराज आजरी, राजेंद्र तारळे, आण्णासाहेब देवगोंडा, बाळासाहेब गुरव, सुरेश कोळकी, अनंत पाटील, प्रा. अनिल कुराडे, पवन तोरगल्ली, आदींनी भाग घेतला. आगार व्यवस्थापक सुनील जाधव, उत्पादन शुल्क विभागाचे पी. ए. मुळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)