शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

काजू प्रकल्पाची जागा मालकांना परत देणार

By admin | Updated: September 10, 2014 23:53 IST

रमेश कीर यांची माहिती : लांजा तालुक्यातील सरकारी प्रकल्पासाठी घेतली होती जागा

रत्नागिरी : पश्चिम घाट विकास कार्यक्रमांंंतर्गत ३२ वर्षांच्या भाडेपट्टा तत्त्वावर लांजा तालुक्यातील खोरनिनकोसह १० गावांत घेतलेल्या खासगी मालकीच्या जमिनी संबंधित शेतकऱ्यांना परत देण्याचा निर्णय राज्य शासनाने ९ सप्टेंबर २०१४ च्या आदेशान्वये घेतला आहे. त्यानुसार ३४५ हेक्टरपैकी २७९.४० हेक्टर जमिनी परत केल्या जाणार आहेत. आघाडी शासनाच्या या निर्णयामुळे लांजा तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळाला असल्याची माहिती कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांनी पत्रकार परिषदेत दिली.लांजा तालुक्यातील ही खासगी जमीन १९८४ साली सरकारने ३२ वर्षांच्या मुदतीकरिता प्रतिहेक्टर २५ रुपये भाडेतत्त्वावर घेतली होती. त्यानंतर लांजा येथे काजू प्रकल्प विभागाची स्थापना करण्यात आली. या प्रकल्पांतर्गत दरवर्षी ६०० हेक्टर जमिनी भाडेपट्ट्यावर ताब्यात घेऊन त्यावर काजू लागवड करणे निश्चित केले होते. १९८४-८५ ते १९८९-९० या कालावधीत शासनाला या भागात केवळ ३४५ हेक्टर क्षेत्र लागवडीसाठी उपलब्ध झाले होते. त्यावर काजू लागवड करण्यात आली होती.या काजूवनापासून शासनाला २०१२पर्यंत १७ लाख ७९ हजार रुपये एवढाच महसूल मिळाला. या उत्पन्नापेक्षा रोपवनावरील खर्च अधिक असल्याने ३२ वर्षांच्या मुदतीपर्यंत हा प्रकल्प चालविणे शासनालाही तोट्याचे होते. त्याचवेळी या प्रकल्पातील जागा परत करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. त्यानुसार ही मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविल्यानंतर आघाडी सरकारने ३४५ हेक्टरपैकी संपादित केलेली ६५.६० हेक्टर जागा वगळता उर्वरित २७९.४० हेक्टर जमीन संबंधित शेतकऱ्यांना परत केली जाणार आहे, असे कीर यांनी सांगितले.शासनाने दिलेल्या आदेशानुसार या जमिनी परत करण्यापूर्वी त्यावर सध्या असलेल्या झाडांची मोजणी व मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतरच जमिनी परत केल्या जातील. काजू प्रकल्पच रद्द झाल्याने पुढील करार होणार नाहीत. अटी व शर्तीनुसार परत करावयाच्या जमिनी या काजू रोपवनासह देण्यात येणार आहेत. काजू फळझाडाव्ंयतिरिक्त अन्य जंगली झाडांची गणना व मूल्यांकन न करता जागेवर उघड लिलाव करून जमिनी परत करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)लांजा तालुक्यातील संपादित जमिनीगावसर्वे नंबरसंपादित क्षेत्र(हेक्टरमध्ये) खोरनिनको१२१७१३.७०खोरनिनको१२१९०१.९०खोरनिनको१२२२५०.००(या संपादित जमिनी परत केल्याजाणार नाहीत.)या जमिनी परत केल्या जाणार...रोपवनांची नावे व सर्व्हे नंबर याप्रमाणे : खोरनिनको-१२२८, १२३२, १३२८, १२३८, १०६५ ते १०६८, १०७८ ते १०८६. प्रभानवल्ली-२४४१ ते २४४६, शिरवली-७०, ७२ पार्ट. व्हेल- ११३०, ७३१, १७३९, १७४३, १७४५, १७५७, १७६९, १७७५, १३९, १४३, १९०, १५१, १९१.आरगाव- २७१, २७३. रिंगणे- २१५, २१६, ५७२, ५७६. सालपे- ११७७, १२५८. कोंडगे- ७२५, २३०, ७५१, ७५२. हर्दखळे-१०१६.