शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

‘महावितरण’ची सेवानिवृत्ती योजना

By admin | Updated: March 30, 2017 23:59 IST

पाल्यास नोकरीची संधी : एप्रिलपासून होणार लागू

कोल्हापूर : ‘महावितरण’च्या वर्ग ‘तीन आणि चार’च्या लाईन फोरमन, मुख्य तंत्रज्ञ, प्रधान तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञ, आदी पदांना शनिवार (दि. १ एप्रिल)पासून ‘मुदतपूर्व सेवानिवृत्ती योजना’ लागू करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्याच्या वयाची ४५ वर्षे पूर्ण होणे आवश्यक आहे.जे तारमार्ग कर्मचारी आपली दैनंदिन कर्तव्य आजारपण, अपघात, आदी कारणांमुळे पार पाडू शकत नाहीत अशा ‘वर्ग-३’ व ‘वर्ग ४’ च्या संवर्गासाठी मुदतपूर्व सेवानिवृत्ती योजना लागू आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘वर्ग-३’मध्ये मोडत असलेल्या कर्मचाऱ्यांची वयोमर्यादा ४५ वर्षे पूर्ण आणि ५३ वर्षांपर्यंत असणे आणि ‘वर्ग-४’साठी ४५ वर्षे पूर्ण व ५५ वर्षांपर्यंत असणे गरजेचे आहे. या योजनेत पात्र होण्यासाठी ‘दैनंदिन कामे सुरळीत पार पाडू शकत नाही,’ अशा आशयाचे शल्य चिकित्सकांचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे बंधनकारक आहे. जे कर्मचारी मुदतपूर्व सेवानिवृत्ती त्यांच्या पाल्यासाठी विद्युत सहायक पदावरील विकल्प शाबूत ठेवून घेत आहेत, त्यांनी त्यांच्या पाल्याची शैक्षणिक माहिती देणेही गरजेचे आहे. यासाठी पाल्य दहावी, बारावी उत्तीर्ण, इलेक्ट्रीकल अथवा वायरमनचा आयटीआय कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.जे कर्मचारी आपल्या पाल्यांना नोकरीचा विकल्प न ठेवता या योजनेचा लाभ घेऊ इच्छितात, त्यांना या योजनेनुसार सेवा झालेल्या प्रत्येक वर्षासाठी ३५ दिवसांचा पगार आणि विहीत सेवानिवृत्तीपूर्वी राहिलेल्या प्रत्येक वर्षासाठी २५ दिवसांचा पगार, अशा सूत्रानुसार एकूण लाभ मिळणार आहे. हा लाभ एकूण जास्तीत जास्त १५ लाख रुपयांपर्यंतच मिळणार आहे.अशा उमेदवारांना सुरुवातीला तीन वर्षांच्या कंत्राटाच्या कालावधीसाठी ७५०० रुपये प्रतिमहा एकत्रित वेतन मिळणार आहे. शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर त्यांना ‘विद्युत सहायक’ या पदावर नेमण्यात येणार आहे. जे पाल्य तीन वर्षांच्या कालावधीत इलेक्ट्रीकल अथवा वायरमनचा आयटीआय कोर्स उत्तीर्ण करू शकले नाहीत तर त्यांना दिलेले एकत्रित वेतन या योजनेनुसार मिळणाऱ्या एकूण रकमेतून वजा करून उर्वरित रक्कम संबंधित कर्मचाऱ्यास अदा करण्यात येईल. या रकमेवर व्याज देण्यात येणार नाही अथवा या कर्मचाऱ्यास पुन्हा नोकरीत सामावून घेण्यात येणार नाही. कर्मचाऱ्यांच्या पाल्याच्या नोकरीसाठी या योजनेत वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे (मागास उमेदवारासाठी ५ वर्षे शिथिल) अशी आहे.