शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

जीवनात पुन्हा उभारी घ्या : अमल महाडीक

By admin | Updated: May 13, 2017 17:41 IST

भारत विकास परिषदेतर्फे ५५ गरजुंना जयपूर फुट वाटप

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. १३ : भारत विकास परिषदेने दिलेल्या बाह्यांगातून आपण जीवनात पुुन्हा उभारी घ्यावी, असे प्रतिपादन आमदार अमल महाडीक यांनी व्यक्त केले. भारत विकास परिषदेच्यावतीने विकलांग सहाय्यता योजनेअंतर्गत करवीर नगर वाचन मंदीर येथे शनिवारी दिव्यांगांना जयपूर फुट व पोलिओ कॅलिपर्स प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी ५५ गरजुंना जयपूर फुट वाटप करण्यात आले. आमदार महाडीक म्हणाले, आजच्या आधुनिक काळात जन्मजात बालकांना कोणत्या प्रकारचे आजार आहेत. याबद्दलची चाचणी करणारे स्कॅनिग मशीन वैद्यकीय क्षेत्रात आली आहेत.त्यामुळे जन्मताच मुले दिव्यांग जन्माला येऊ नये याकरीता काळजी घेणे काळाची गरज आहे. काही वेळेला आपल्या हलगर्जीपणामुळे आपल्याला दिव्यांगपणा येतो. यात कोणत्या प्रकारची हलगर्जी जीवावर बेतू शकते. हे आजच्या युवा पिढीलाही समजणे गरजेचे आहे. याकरीता सोशल मिडीयावरुन याबाबत पदोपदी चुकीच्या पद्धतीने वाहने हाकणाऱ्यांना त्यांच्या हलगर्जीपणाची जाणीव करुन द्यावी. आपण कसे वागलो आणि काळजी घेतली असती तर आपण सर्वांसारखेच असतो हेही त्यातून प्रबोधन करणे गरजेचे आहे. जिल्हा दिव्यांगमुक्त करण्यासाठी सर्वांनीच पुढे येणे गरजेचे आहे. ज्या काही सोयी सुविधा दिव्यांगाना हव्या आहेत. दिव्यांगांना लागणाऱ्या मदतीसाठी आपण सदैव तयार आहे. भारत विकास परिषदेचे काम कौतुकास्पद आहे. अशा प्रकारच्या चांगल्या कामासाठी निधी उभा करण्यासाठी दानशूर व्यक्ती , संस्था, उद्योजक आपण उद्युक्त करु. स्वागत मनिषा शेणई यांनी ; तर प्रास्ताविक शाखा अध्यक्ष सतीश कुलकर्णी यांनी केले. यावेळी जयंत जेस्ते, श्रीकृष्ण साळोखे, सुर्यकिरण वाघ, नितीन वाडीकर, भाजपा जिल्हा अध्यक्ष संदीप देसाई, आदी उपस्थित होते.