शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ट्रेलरचे पासिंग पुन्हा सुरू

By admin | Updated: February 6, 2015 00:38 IST

उद्योगांना नवसंजीवनी : ब्रेकपॉर्इंट काढण्याचे परिवहन आयुक्तांचे आदेश

सतीश पाटील - शिरोलीगेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेले ट्रेलरचे पासिंग पुन्हा सुरू झाले आहे. याबाबतचा अध्यादेश काढण्यात आला आहे. या अध्यादेशामुळे बंद पडलेल्या ट्रेलर उद्योगांना नवसंजीवनी मिळाली आहे. हा अध्यादेश केंद्रीय परिवहन आयुक्त संजय बंडोपाध्याय यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय यांना दिला आहे.ट्रेलरला आॅईल ब्रेक आणि हायड्रोलिक ब्रेक यंत्रणा बसवणे याबाबतचा आदेश केंद्रीय वाहतूक आयुक्त कार्यालयाने सन २००९ मध्ये जारी केला आहे. त्यामुळे ट्रेलर उद्योग अडचणीत सापडले होते. गेल्या सहा वर्षांत ट्रेलर उद्योजक, केंद्रीय परिवहन खाते, सचिव व वाहतूक आयुक्त आणि ट्रॅक्टर कंपन्या यांच्यात बऱ्याचवेळा चर्चा, बैठका झाल्या. यातून ट्रेलर उद्योगांनाही काहीवेळा पासिंग सुरू करून दिले होते; पण डिसेंबर २०१३ मध्ये माजी कृषिमंत्री शरद पवार, केंद्रीय वाहतूक आयुक्त संजय बंडोपाध्याय, ट्रॅक्टर उद्योजक आणि ट्रेलर उद्योजक यांची बैठक झाली होती. यावेळी ट्रॅक्टर कंपन्यांनी ट्रॅक्टरला ब्रेक सप्लाय पॉर्इंट काढून देण्याचे ठरले होते.गेल्या पाच महिन्यांपासून ट्रेलर उद्योग बंद होते. ट्रेलरचे पासिंग सुरू करावे, यासाठी अ‍ॅग्रिकल्चरल असोसिएशन (आयमाच्या) माध्यमातून परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन बंद पडलेले पासिंग पुन्हा सुरू करण्यात यश आले आहे.- कृष्णात पाटील, अध्यक्ष आयमा पासिंग बंद असल्याने उद्योगच अडचणीत आले होते. ट्रेलरचे उत्पादन बंद होत आले होते. कामगारांनाही बेरोजगाराची वेळ आली होती. ट्रेलर पासिंग होत नसल्याने शेतकरीही संकटात होते. परंतु, पुन्हा ट्रेलर पासिंग सुरू झाल्याने ट्रेलर उद्योगांना नवसंजीवनी मिळाली. - सुशांतकुमार मिरजे, ट्रेलर उद्योजक