शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

‘टोल’चा निकाल दिवाळीपूर्वी ?

By admin | Updated: October 1, 2014 01:17 IST

सुनावणी संपली : कोल्हापूरकरांची उत्सुकता पुन्हा ताणली

कोल्हापूर : रस्ते प्रकल्पाचा चुकीच्या पद्धतीने झालेला करार, ‘आयआरबी’ला कवडीमोलाने दिलेली जागा, कंपनीने एक कोटी रुपयांची जादा दिलेली बॅँक गॅरंटी, टोलसाठी होणारा विरोध, आदी मुद्द्यांवर आज, मंगळवारी उच्च न्यायालयात कोल्हापूरच्या टोलप्रश्नी चर्चा झाली. याचिकाकर्ते, राज्य शासन, महापालिका, आयआरबी व रस्ते विकास महामंडळ, आदींनी न्यायालयात म्हणणे सादर केले. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस. सी. धर्माधिकारी व ए. के. मेनन यांच्या खंडपीठाने सुनावणी संपल्याने जाहीर केले. न्यायालय सर्व मुद्द्यांचा अभ्यास करून दिवाळी सुटीपूर्वी अंतिम निकाल देण्याची शक्यता आहे.टोलप्रश्नी सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानेच सोमवार (दि. २९) पासून दोन दिवसांची अंतिम सुनावणी पूर्ण झाली. सकाळच्या सत्रात सुभाष वाणी, शिवाजीराव परुळेकर व अमर नाईक यांच्यातर्फे अ‍ॅड. अभय नेवगी यांनी म्हणणे मांडले. टेंबलाईवाडी येथील ३६ हजार चौरस मीटरची जागा ‘आयआरबी’ला देण्याची घाई रस्ते महामंडळाने केली. या जागेवर पूर्वी टिंबर मार्केट व सध्या मैदानाचे आरक्षण आहे. टोलची मुदत ३० वर्षे, तर जागा मात्र ९९ वर्षे कराराने नाममात्र एक रुपया वार्षिक भाड्याने देण्यात आली. अशा प्रकारे नागरी मालमत्तेचा विचार न करता चुकीचा करार केला आहे. हा करारच बेकायदेशीर असल्याने टोल रद्द करावा, अशी मागणी अ‍ॅड. नेवगी यांनी केली.सरकारी वकील वैजयानी यांनी शासनाची बाजू मांडली. त्यांनी ‘सोव्हिल’ या सल्लागार कंपनीच्या प्रमाणपत्राच्या आधारेच शासनाने टोलवसुलीस परवानगी दिल्याचे न्यायालयात स्पष्ट केले. रस्ते महामंडळाचे वकील अजित चव्हाण यांना न्यायालयाने ९९ वर्षांच्या कराराने जागा देण्यापूर्वी रस्ते महामंडळाने नागरी हिताचा विचार का केला नाही? अशी विचारणा केली.‘आयआरबी’चे वकील जनक द्वारकादास यांनी कंपनीने २४ कोटी रुपयांच्या अपूर्ण कामांसाठी २५ कोटी रुपयांची बॅँक गॅरंटी महापालिकेकडे जमा केल्याचे सांगितले. रस्ते प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करणे व विरोधी आंदोलनास सुरुवात झाली. प्रकल्पाच्या सुरुवातीसच का विरोध झाला नाही? आदी मुद्दे उपस्थित केले. टोलसाठी राज्य शासनाची स्थगिती होती. तसेच यापूर्वीही याचिका दाखल केल्याचे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणला. (प्रतिनिधी)