शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

दक्षिण महाराष्ट्रात काँग्रेसला उभारी देणारा निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:01 IST

विश्वास पाटील लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पुणे शिक्षक मतदारसंघातून प्रा. जयंत आसगावकर यांना विजयी करून कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज ...

विश्वास पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : पुणे शिक्षक मतदारसंघातून प्रा. जयंत आसगावकर यांना विजयी करून कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी पक्षनेतृत्वाला दिलेला शब्द खरा करून दाखविला. दिल टाकलेल्या पैलवानासारखी स्थिती झालेल्या काँग्रेसला त्यांनी लढायला आणि जिंकायलाही शिकविल्याचे प्रत्यंतर या निकालाने आले. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे सर्वच जिल्ह्यांत मिळालेले भक्कम पाठबळ हेदेखील या विजयाचे महत्त्वाचे कारण आहे.

दक्षिण महाराष्ट्रात विधानसभेच्या ५८ जागा येतात. त्यामध्ये काँग्रेसचे सध्या पुण्यात दोन, सोलापूर, साताऱ्यात प्रत्येकी एक आणि सांगलीत दोन आमदार आहेत. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेचे चार व आता विधानपरिषदेचे दोन असे तब्बल सहा आमदार झाले आहेत. काँग्रेसचा भरभराटीचा काळ होता तेव्हाच एवढी पक्षाची ताकद होती. विधानसभेच्या निवडणुकीतही शून्यावरून चार आमदार निवडून आणण्यात सतेज पाटील यांनी घेतलेले कष्ट कारणीभूत होते. ऋतुराज पाटील, चंद्रकांत जाधव, राजूबाबा आवळे यांच्यासारख्या नव्या चेहऱ्यांना विजयी करण्यासाठी ते पायांना भिंगरी लावून फिरले. तसेच कष्ट त्यांनी आता आसगावकर यांच्या विजयासाठी घेतले. या मतदारसंघातून एकूण सहाजण इच्छुक होते; परंतु आसगावकर यांच्या उमेदवारीवर मोहोर उठविल्यावर अन्य पाचजणांना एकत्र करून त्यांना विश्वास दिला व जिल्ह्यात त्यांच्यात मतैक्य घडविले. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून आसगावकर यांना एकमुखी पाठबळ मिळाले. आसगावकर हे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले होते. तशी त्यांची फारशी तयारीही नव्हती आणि त्यांचा चेहराही फारसा परिचित नव्हता; त्यामुळे त्यांच्या मागे जनमत उभे करण्याचे शिवधनुष्य त्यांनी पेलले. ‘तुम्हाला शिक्षक हवा की संस्थाचालक?’ असाही प्रचार झाला; परंतु तो मतपेटीपर्यंत जाणार नाही, याची दक्षता घेतली. जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी स्वत:ची सगळी यंत्रणा उभी केली. आसगावकर उमेदवार असले तरी आपण स्वत: उमेदवार असल्यासारखे ते या निवडणुकीत राबले. त्यांना पहिल्या पसंतीची मते कशी जास्तीत जास्त मिळतील असे प्रयत्न त्यांनी केले. एकदा डोक्यात निवडणूक भिनली की त्यात गुलाल लागेपर्यंत उसंत घ्यायची नाही असा त्यांचा स्वभावच बनला आहे. त्यामुळेच ते नवख्या उमेदवाराला रिंगणात उतरवून विजय खेचून आणू शकले. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी खूप मेहनत घेतली.