शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
2
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
3
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सतारा टोल रोड प्रोजेक्ट
4
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
5
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
6
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
7
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
8
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र
9
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
10
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
11
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
12
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
13
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
14
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
15
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं
16
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
17
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
18
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
19
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
20
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी

‘जयप्रभा’चा निकाल २९ ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 00:47 IST

कोल्हापूर : जयप्रभा स्टुडिओच्या जागेच्या मूळ खरेदीपत्रात सरकारने घालून दिलेली अट ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांना बंधनकारक असल्याने तसेच ...

कोल्हापूर : जयप्रभा स्टुडिओच्या जागेच्या मूळ खरेदीपत्रात सरकारने घालून दिलेली अट ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांना बंधनकारक असल्याने तसेच या जागेच्या तीन एकरांवर ‘स्टुडिओ’ असे आरक्षण असल्याने त्याचा इतर कारणांसाठी वापर करता येणार नसल्याचा युक्तिवाद चित्रपट महामंडळाच्या वतीने अ‍ॅड. प्रकाश मोरे यांनी मंगळवारी न्यायालयात मांडला. दरम्यान, दोन्हीही बाजूंनी सुनावणी पूर्ण झाल्याने यावर २९ एप्रिलला निकाल देण्यात येणार आहे.बेलबाग येथील जयप्रभा स्टुडिओ पाडून ही जागा बिल्डरला देण्याच्या निर्णयामुळे २०१४ साली कोल्हापुरात लता मंगेशकर यांच्याविरोधात मोठे जनआंदोलन उभारले गेले होते. त्यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने हा स्टुडिओ शासनाने ताब्यात घेऊन त्याचा विकास करावा, अशी याचिका दिवाणी न्यायालयात दाखल केली होती. या प्रकरणाची अंतिम सुनावणी कोल्हापुरातील न्यायालयात मंगळवारी पूर्ण झाली.अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या वतीने तसेच प्रमोद शिंदे, माजी अध्यक्ष दिवंगत यशवंत भालकर, प्रसाद सुर्वे यांच्यासह अर्जुन नलवडे, भालचंद्र कुलकर्णी, भास्कर जाधव, विजय शिंदे, चंद्रकांत जोशी यांच्या वतीने मंगळवारी अंतिम सुनावणीवेळी अ‍ॅड. प्रकाश मोरे यांनी बाजू मांडली. जयप्रभा स्टुडिओच्या मूळ खरेदीपत्रात सरकारने घातलेली अट ही ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांना बंधनकारक आहे. शहराच्या दुसऱ्या विकास योजनेत १९९९ मध्ये अर्धा भाग स्टुडिओसाठी, तर अर्धा भाग रहिवासी आरक्षित आहे. तीन एकर जागेवर स्टुडिओ असेही आरक्षण असल्याने त्याचा इतर कारणांसाठी तसेच व्यापारी संकुलासाठीही विक्री करता येणार नाही. या जागेवरील हेरिटेज प्रक्रिया यापूर्वी कोल्हापूर महानगरपालिकेने अर्धवट सोडली; पण त्यासाठी शासनाने २०१० मध्ये नगररचना उपसंचालक नेमले होते. त्या आदेशाविरोधात लता मंगेशकर यांनी उच्च न्यायालयात फेरयाचिका दाखल केली होती. ती २०१५ मध्ये न्यायालयाने फेटाळली. त्यानंतर ते मंगेशकर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केले; पण नंतर त्यांनीच याचिका मागे घेतली. त्यामुळे या जागेला हेरिटेज ग्रेड ३ हा दर्जा कायम आहे. या जागेचा वापर हा हेरिटेज रेग्युलेशनमधील तरतुदीनुसार करावा लागेल. त्यामुळे लता मंगेशकर यांना स्टुडिओत किरकोळ दुरुस्ती करता येईल; पण त्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेची परवानगी घ्यावी लागेल, असेही युक्तिवादात अ‍ॅड. मोरे यांनी मांडले.दोन्हीही बाजूंचा अंतीम युक्तिवाद संपल्याने २९ एप्रिल रोजी निकाल जाहीर करण्यात येईल, असे दिवाणी न्यायाधीश ए. ए. भोसले यांनी सांगितले.