शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गड-किल्ल्यांचे संरक्षण सर्वांची जबाबदारी

By admin | Updated: February 12, 2017 00:34 IST

संभाजीराजे : पन्हाळगडावरून गडकोट स्वच्छता मोहिमेस प्रारंभ

पन्हाळा : गड-किल्ल्यांचे संरक्षण व संर्वधन ही माझी, तुमची, सर्वांची जबाबदारी आहे. शिवछत्रपतींचा वारसा जपत असताना महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे संरक्षण होणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन व गडसमितीचे ब्रँड अ‍ॅम्बॅसडर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केले. पन्हाळा येथे गड-किल्ल्यांची स्वच्छता करण्यासाठी आलेल्या युवकांना त्यांनी संबोधित केले. खासदार संभाजीराजे यांचा शनिवारी वाढदिवस असल्याने त्याना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी झाली होती. संभाजीराजे म्हणाले, येत्या १९ तारखेला शिवजयंती साजरी होत आहे. त्याचे औचित्य साधून ११ फेब्रुवारीपासून ही गडकोट स्वच्छता मोहीम सुरू करीत आहोत. महाराष्ट्रातील १०३ गड-किल्ल्यांची स्वच्छता मोहीम शिवजयंतीपर्यंत चालू राहील. गड-किल्ल्यांचे जतन, संवर्धन व संरक्षणासाठी केंद्र व राज्य सरकारने ३५० कोटी रुपये मंजूर केले असून, सुरुवात रायगडवरून होणार आहे. रायगड संरक्षणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या टप्प्यात ७० कोटी रुपये पुरातत्त्व खात्याकडे वर्ग केले आहेत. या मोहिमेस पुरातत्त्व खात्याचे डायरेक्टर आॅफ जनरल पुरातत्त्व खात्याने मंजुरी दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉ. अमर अडके, निसर्गमित्र अनिल चौगुले, धैर्यशील माने, शाहीर दिलीप सावंत, कोल्हापूरच्या महापौर हसिना फरास, पन्हाळ्याच्या नगराध्यक्षा रूपाली धडेल उपस्थित होते. पन्हाळगडावर वीर शिवा काशीद पुतळ्यापासून पुसाटीपर्यंत सर्व युवकांनी गड स्वच्छता करून अंदाजे दोन टन कचरा जमा केला. या मोहिमेत खासदार संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगिताराजे, माजी आमदार मालोजीराजे, मधुरिमाराजे, युवराज छत्रपती यांच्यासह छत्रपती घराण्यातील सर्वांचा सहभाग होता. या गड स्वच्छता मोहिमेत ८० संस्थांनी व विविध मान्यवरांसह २०००हून अधिक युवक, युवती, ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. पन्हाळगड येथे शनिवारी गड स्वच्छता मोहिमेचे उद्घाटन केल्यानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मार्गदर्शन केले.