कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या रक्तदानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत बँकहेम ग्रुप, कोल्हापूर एस. टी. आगार कर्मचारी आणि शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
बँकहेम ग्रुपतर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात २५ पिशव्या रक्त संकलित करण्यात आले. यावेळी माजी आमदार सुरेश साळोखे, अवधूत साळोखे, गणेश लाड, राहुल नाईक, सुनील सामंत, ज्ञानेश्वर साळोखे, प्रकाश साळोखे, अक्षय तिवले, अश्विन बोगार, मयुर साळोखे, सचिन साळोखे आदी उपस्थित होते. एस. टी. आगार कर्मचारीवर्गातर्फे अविनाश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ३५ पिशव्यांचे संकलन करण्यात आले. आगार व्यवस्थापक अजय पाटील, योगिराज शेळके, नीळकंठ कळंत्रे, हणमंत गुरव, नामदेव रोडे आदी मान्यवर उपस्थित होते. शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरालाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी शहराध्यक्ष आर. के. पोवार, प्रकाश पाटील, आदील फरास, आनंदराव पायमल, जहिदा मुजावर, सुनील देसाई, डाॅ. अमित आवळे, सुवर्णसिंग चव्हाण, वनराज म्हस्के, नवल चव्हाण, संजू बडगिरे आदी मान्यवर उपस्थित होते.