कोल्हापूर : राज्यातील रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना रक्तदान शिबिरे घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार युवा सेना व देवराज नरके युवा शक्तीच्या माध्यमातून वडणगे येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला दात्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
या शिबिराचा प्रारंभ माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कुंभी बँकेचे अध्यक्ष अजित नरके, डॉ. सुनील पाटील, देवराज नरके, जिल्हा परिषद सदस्या कोमल मिसाळ, पंचायत समिती सदस्य इंद्रजीत पाटील, चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाजीराव पाटील, महिला आघाडीप्रमुख शुभांगी पोवार, वडणगेचे उपसरपंच सतीश पाटील, रमेश कुंभार, सयाजी घाेरपडे, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो ओळी : युवा सेनेच्यावतीने वडणगे (ता. करवीर) येथे आयोजित रक्तदान शिबिराचा शुभारंभ माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शुभांगी पोवार, कोमल मिसाळ, बाजीराव पाटील, देवराज नरके, अजित नरके आदी उपस्थित होते. (फोटो-०४०१२०२१-कोल-वडणगे)