शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

‘लोकमत शॉपिंग उत्सवा’ला प्रतिसाद

By admin | Updated: January 8, 2016 01:06 IST

रविवारपर्यंत रंगणार उत्सव : खरेदीसह मनपसंत खाद्याची पर्वणी; हजारोंची बक्षिसे जिंकण्याची संधी

कोल्हापूर : करवीरनगरीतील परिपूर्ण कुटुंबासाठीचा सर्वांत मोठा खरेदी उत्सव ‘लोकमत शॉपिंग उत्सव-२०१६’ कोल्हापूरकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात गुरुवारी सुरू झाला. दिवसभर नागरिकांनी खरेदीसह लज्जतदार खाद्यपदार्थांचा आनंद लुटला. शहरवासीयांसाठी राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवनात रविवार (दि. १०) पर्यंत हा उत्सव रंगणार आहे. प्रदर्शनामध्ये खरेदी करणाऱ्यांना हजारो रुपयांची बक्षिसे जिंकण्याची संधी आहे.कोल्हापूरकरांना प्रतीक्षा लागून राहिलेल्या ‘लोकमत शॉपिंग उत्सव-२०१६’चे सायंकाळी पाच वाजता करवीर आदर्श महिला औद्योगिक संस्थेच्या अध्यक्षा प्रतिमा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी वॉव ज्वेल कलेक्शनचे नीलेश झवेरी व धीरज राठोड, हॅपी हाऊसचे राजेश कोलार उपस्थित होते. ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी प्रमुख उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शॉपिंग उत्सव सकाळी दहा वाजल्यापासून खुला झाला. सायंकाळी कुटुंबासमवेत, काहीजण मित्र-मैत्रिणींसमवेत येथे आले होते. उत्सवातील फोर व्हिलर, इलेक्ट्रॉनिक्स, किचन अ‍ॅप्लायन्सेस, फर्निचर, होम अ‍ॅप्लायन्सेस, होम डेकॉर, पर्सनल केअर, फॅशन्स, फूड प्रॉडक्टस्, हेल्थ केअर संबंधित वस्तू व त्यांच्या सेवांच्या माहितीचे स्टॉल लावले आहेत. विविध प्रकारची लोणची, चटणी आणि रोजच्या वापराच्या वस्तूंच्या स्टॉल्सचाही समावेश आहे. काही स्टॉलधारकांनी आकर्षक सवलती दिल्या आहेत. त्याची माहिती घेण्यासह खरेदीही धुमधडाक्यात सुरू झाली. मनसोक्त खरेदीनंतर अख्खा मसूर, रोटी, ढोकळा, कच्छी दाबेली, अशा विविध लज्जतदार पदार्थांचा आबालवृध्दांनी आस्वाद घेतला. रंगीबेरंगी विद्युत रोषणाई, मधुर संगीताचे सूर आणि भरगच्च स्टॉल अशा वातावरणात उत्सवाला कोल्हापूरकरांनी पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उत्सवाचे प्रायोजक ‘वॉव ज्वेल कलेक्शन’ तर, सहप्रायोजक ‘स्लीपवेल’ आहेत. (प्रतिनिधी)सुंदर साडी, उखाणे स्पर्धा आजउत्सवांतर्गत डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवनात ‘लोकमत’ सखी मंच आणि बालविकास मंचतर्फे विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. यात सखी मंचतर्फे आज, शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता सुंदर साडी व उखाणे स्पर्धा होईल. बालविकास मंचतर्फे शनिवारी (दि. ९) दुपारी साडेचार वाजता ‘माझे आवडते कार्टून’ विषयावर चित्रकला स्पर्धा आणि रविवारी (दि. १०) दुपारी बारा वाजता फॅन्सी ड्रेस स्पर्धा होणार आहे.सोन्याच्या नथीच्या मानकरी ठरल्या सुवर्णा यादवशॉपिंग उत्सवाला भेट देणाऱ्यांसाठी ‘लोकमत’ने लकी ड्रॉ आयोजित केला आहे. पहिल्या दिवशी काढलेल्या ड्रॉमध्ये चिपडे सराफतर्फे सोन्याच्या नथीच्या मानकरी बालिंगा (ता. करवीर) येथील सुवर्णा यादव ठरल्या.मे. श्री गणेश एंटरप्रायझेसतर्फे दिल्या जाणाऱ्या वॉटर प्युरिफायरच्या विजेत्या प्रिया देसाई आणि स्लिपवेलच्या बेडशीटचे विजेते पी. पी. लाड ठरले. ‘द नीड’च्या आकर्षक भेटवस्तूचे विजेते कैलास माळी, तर दिग्विजय कांबळे, रेखा घबाले, साधना कोकीटकर, छाया विभूते, मंगला सारडा, भारत कांबळे अन्य बक्षिसांचे मानकरी ठरले. या विजेत्यांना आज, शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता उत्सवाच्या ठिकाणी बक्षीस दिले जाणार आहेत. या स्वरूपातील बक्षिसे लकी ड्रा शॉपिंग उत्सवात रोज दिली जाणार आहेत.