बिनविरोध उमेदवारांची नावे अशी - संजय अंतू कळंत्रे, रंजना रंगराव तांबेकर, पांडुरंग कुंभार, सुनील नारायण घोरपडे, गीता दत्तात्रय गुरव, धनश्री रवींद्र पाटील, रंजना नारायण ढोले, प्राजक्ता साताप्पा कांबळे, संजय पांडुरंग कांबळे.
यावेळी श्रीपती देवडकर, पी. वाय. डावरे, बापुसो ढोले, जयसिंग पाटील, रोहित लोहार, सतीश लोंढे यांची भाषणे झाली. यावेळी नारायण ढोले, बाळासो पाटील, श्रीधर डावरे, तानाजी पाटील, धनाजी पाटील, बाळासो घोरपडे, आदी उपस्थित होते. शंकर पोवार यांनी आभार मानले.
समझोता ''''एक्स्प्रेस'''' रुळावर
ग्रामदैवत चौंडेश्वरी देवीच्या मंदिर जीर्णोद्धारासाठी ८० लाख लोकवर्गणी जमा करत श्रमदान केले. गेल्या दहा महिन्यांत राजकीय गटातटाला वेशीबाहेर ठेवत एकजूट दाखवली. महिनाअखेरीस या मंदिराचा वास्तुशांती सोहळाही उत्साहात करण्याच्या निर्धाराने आणि परंपरा कायम ठेवण्याच्या हेतूने निवडणूक बिनविरोध करण्यात आली. २५ वर्षांनंतर गतवेळी निवडणूक लागली होती.
कँप्शन
सोनगे येथील बिनविरोध सदस्यांचा सत्कार करताना जीर्णोद्धार कमिटी व मान्यवर.