शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी उमेदवारांबद्दल आदर, पक्षनिष्ठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 00:51 IST

मी मूळची कºहाडची. माझे वडील वासुदेव किरपेकर हे स्वातंत्र्यसेनानी. सक्रिय चळवळीमुळे त्यांना सहा वर्षांचा तुरुंगवास झाला होता. येरवडा जेलमध्ये ...

मी मूळची कºहाडची. माझे वडील वासुदेव किरपेकर हे स्वातंत्र्यसेनानी. सक्रिय चळवळीमुळे त्यांना सहा वर्षांचा तुरुंगवास झाला होता. येरवडा जेलमध्ये ते आणि यशवंतराव चव्हाण एकाच बरॅकमध्ये होते. माझ्या घरी कायमच यशवंतरावांसह अनेक मोठ्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा राबता असायचा. त्यावेळी काँग्रेसचे चिन्ह होते बैलगाडी. पुढे हात चिन्ह आले.मी जो काळ पाहत मोठी झाले, वाढले त्या काळात उमेदवार एकमेकांचा आदरपूर्वक उच्चार करायचे. पक्ष असो वा व्यक्ती दोन्ही पातळींवर एका मर्यादेचे पालन केले जायचे. समजुतीने निर्णय घेतले जायचे. आपण संसदेत जाण्याकरीता ज्या पदासाठी निवडणूक लढवत आहोत त्या पदाचा सन्मान आणि आदर राखून प्रचारात भाषा वापरली जायची. निवडणुका आल्या की शहरात वेगळेच वातावरण असायचे. त्यावेळी यशवंतराव चव्हाण कºहाडमधून लढायचे, तेव्हा आजच्यासारखी हायटेक प्रचारयंत्रणा नव्हती. त्यामुळे कितीही मोठा नेता असला तरी घरोघरी जाऊन, प्रत्येक मतदाराला भेटून आपल्याला मतदान करण्यासाठी आवाहन करायचे. कोणताही डामडौल नाही की अफाट खर्च नाही. मी पहिल्यांदा मतदान केले १९६९-७०च्या दरम्यान तेही कोल्हापुरात. त्यावेळी आपल्या मताला, विचारांना काही महत्त्व आहे या जबाबदारीची जाणीव झाली. त्यावेळी नेत्यांमध्ये पक्षनिष्ठा असायची. त्यांच्या ‘शब्दा’वर जनतेचा विश्वास बसायचा आणि नेतेही दिलेले आश्वासन पूर्ण करायचे. प्रश्न सोडवायचे. आता ती विश्वासार्हता राहिलेली नाही. त्यामुळे कोणताही उमेदवार निवडून आला तरी सर्वसामान्यांच्या परिस्थितीत काही फरक पडत नाही असे एक निराशाजनक चित्र आहे.गेल्या काही वर्षांत निवडणुकीतील प्रचाराने खालचे टोक गाठले आहे. जिंकणे हे उद्दिष्ट असले तरी त्यात आजच्यासारखी एकमेकांवर जहरी आणि हीन टीकाकेली जात नसे किंवा दुसऱ्याला ठरवून खाली खेचण्यासाठीची स्पर्धा नव्हती. आता निवडणुकीच्या काळात आणि इतरवेळीही जे काही घडतंय ते आमच्यासारख्यांच्या बुद्धीपलीकडचे आहे. आपलानेमका अजेंडा काय, आपले विचार काय, आपण काय करतोय आणि नेमकं काय साधायचंय याबद्दल कार्यकर्तेच काय नेत्यांचीही दृष्टी धूसर झाली आहे, असे दुर्दैवाने वाटते.-डॉ. वासंती टेंबे, जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका