शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

आरक्षणावरून गदारोळ

By admin | Updated: November 8, 2015 00:16 IST

महापालिका सभा : शेटे यांचा सहायक संचालकांवर सुपारीचा आरोप

कोल्हापूर : शहरातील मोक्याच्या जागांवर असणारी बगीचा व प्राथमिक शाळेची आरक्षणे उठविण्यासाठी नगररचना विभागाचे सहायक संचालक धनंजय खोत यांनी सुपारी घेतल्याचा खळबळजनक आरोप भूपाल शेटे यांनी शनिवारी महानगरपालिका सर्वसाधारण सभेत केला. कागदपत्रे अपूर्ण असताना, जागेचा मालक कोण हे सिद्ध झाले नसताना आणि जागा खरेदीची आर्थिक कुवत नसताना ती जागा महानगरपालिका का आणि कोणाच्या फायद्यासाठी खरेदी करीत आहे, अशी विचारणाही त्यांनी केली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर वैशाली डकरे होत्या. प्राथमिक शाळा व बगीच्यासाठी आरक्षित असलेल्या जागा खरेदीचा प्रस्ताव आणि ई वॉर्ड परिसरात उभारण्यात येणाऱ्या पंपिंग स्टेशनवरून महासभेत अधिकाऱ्यांवर चौफेर हल्लाबोल करण्यात आला. आरक्षित जागा खरेदी करण्यासंबंधीचा प्रस्ताव सभागृहात सादर करण्यापूर्वी संबंधित जागामालकाचे खरेदीपत्र का मागून घेण्यात आले नाही, याचा जाब अधिकाऱ्यांना विचारला. त्यावेळी खरेदीपत्राची प्रत सादर केली जाईल, असे सांगितले; परंतु सभेचे कामकाज संपले तरीही त्या खरेदीपत्राची प्रत आली नाही. त्यामुळे जोपर्यंत मूळ खरेदीपत्र मिळत नाही, तोपर्यंत प्रस्तावाला मंजुरी देणार नाही, अशी भूमिका सदस्यांनी घेतली. शहरातील ई वॉर्ड रि. स. नंबर ८५/२ब पैकी व ८६/२ पैकी ३०८० चौरस मीटर क्षेत्र बगीच्यासाठी आरक्षित आहे, तर रि. स. नंबर ९०५/१ पैकी ३४३३.६७ चौरस मीटर क्षेत्र महापालिका प्राथमिक शाळेसाठी आरक्षित आहे. या जागा खरेदी करण्याबाबत मालकांनी महापालिकेला परचेस नोटीस पाठविली आहे. त्यामुळे तसा प्रस्ताव नगररचना विभागाने महासभेसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे. गेल्या तीन सभांमध्ये या विषयावर चर्चा होऊन मूळ मालकाच्या खरेदीपत्रासह सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करा, मगच प्रस्ताव मंजूर करू, अशी भूमिका सदस्यांनी घेतली आहे. शनिवारीही अपूर्ण कागदपत्रांचाच प्रस्ताव महासभेसमोर आणल्यामुळे सदस्य संतप्त झाले. आपली आर्थिक परिस्थिती चांगली नाही, तरीही एका जागेच्या मोबदल्यात ३ कोटी ९८ लाख आणि ४२ लाख ७२ हजार व्याज; तसेच दुसऱ्या जागेस ५ कोटी ७९ लाख आणि व्याज ६२ लाख ०७ हजार रुपये महापालिकेला मोजावे लागणार आहेत. जागा खरेदी करताना रीतसर करा, मूळ मालकांकडून खरेदीपत्राची कागदपत्रे घ्या, पॉवर आॅफ अ‍ॅटर्नीची कागदपत्रे घ्या, अशी मागणी असताना त्यासाठी टाळाटाळ का करण्यात येते, असा प्रश्न अधिकाऱ्यांना केला. कदमांच्या जागेवरून अधिकाऱ्यांना घेरले ई वॉर्ड, बापट कॅम्प परिसरात उभारण्यात येणारे सांडपाणी उपसा केंद्र व त्याकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी शेती व ना-विकास क्षेत्रातून जागा वगळण्याचा विषयही सभागृहात चांगलाच गाजला. जेवढी जागा पाहिजे आहे, तेवढ्याच जागेचे क्षेत्र वगळा, अशी आग्रही मागणी राजेश लाटकर यांनी केली. जी व्यक्ती फुकट जागा देत आहे, त्याची जागा न घेता दुसऱ्याच व्यक्तीची जागा घेऊन त्या संपूर्ण परिसरातील झोन बदलण्याचा उद्योग कोणाच्या फायद्यासाठी करीत आहात, अशी विचारणा लाटकर यांनी केली.