शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

विस्तार अधिकाऱ्यांच्या बदलीचा झाला ठराव

By admin | Updated: July 18, 2014 00:24 IST

आजरा पंचायत सभा : ग्रामसेवकांकडून पैसे घेत असल्याचा जाहीर आरोप

आजरा : आजरा पंचायत समितीतील विस्तार अधिकारी ग्रामसेवकांकडून पैसे घेत असल्याचे पुराव्यांनिशी आपण सिद्ध करू शकतो, असा आरोप सभापती अनिता नाईक यांनी करत तालुका पंचायत अधिकाऱ्यांच्या बदलीचा ठराव पंचायत समितीच्या मासिक सभेत करण्यात आला.आजरा पंचायत समितीची मासिक सभा सभापती अनिता नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेच्या सुरुवातीस आजरा साखर कारखान्याचे नूतन अध्यक्ष व पंचायत समिती सदस्य विष्णुपंत केसरकर यांचा सत्कार करण्यात आला. गटविकास अधिकारी एस. व्ही. केळकर यांनी स्वागत केले.विविध खात्यांचा आढावा घेताना तालुका पंचायत अधिकारी किरण खटावकर यांच्या कारभाराचा प्रश्न सभापती नाईक यांनी उपस्थित केला. खटावकर हे काही ग्रामसेवकांकडून पैसे घेतात, अशी ग्रामसेवकांची तक्रार असून, त्याबाबतचे पुरावे ग्रामसेवकांनी आपल्याकडे दिले आहेत ही बाब गंभीर आहे, असे सुनावले. तर याचवेळी इतर सदस्यांनी खटावकर यांच्या बदलीचा ठराव मांडला.सभेमध्ये एखाद्या अधिकाऱ्यांबाबत सभापतींनी पुराव्यानिशी आरोप करणे हे गंभीर असून, इतर अधिकाऱ्यांनीही आपली वागणूक सुधारावी, असे सदस्य विष्णुपंत केसरकर यांनी सांगितले. ग्रामसेवकांबाबत अनेक तक्रारी असताना त्यांच्यावर अधिकारी कारवाई का करीत नाहीत, असा प्रश्नही केसरकर यांनी उपस्थित केला.सदस्या कामिना पाटील यांनी शतकोटी वृक्ष लागवडीचा प्रश्न उपस्थित केला. कोवाडे येथील पाणलोट अंतर्गत बांधलेल्या सिमेंट बंधाऱ्याच्या दर्जाचा प्रश्न उपसभापती तुळशिराम कांबळे यांनी उपस्थित केला. सदर बांधकामासाठी नदीचीच वाळू वापरली असल्याचेही कांबळे यांनी स्पष्ट केले.वीज वितरण कंपनीकडून तालुक्यातील १७५ पोल बदलण्यात येणार असल्याचे सिकनिस यांनी सांगितले. चर्चेत सदस्य दीपक देसाई, निर्मला व्हनबट्टे यांनी भाग घेतला. उपसभापती तुळशिराम कांबळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)