शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

विद्यापीठाच्या बृहत् आराखड्यात ‘हलकर्णी’च्या समावेशाचा ठराव

By admin | Updated: November 30, 2014 23:57 IST

‘लोकमत’च्या वृत्ताची दखल : विद्यार्थ्यांची पदवी शिक्षणासाठी पायपीट

गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्व भागातील विद्यार्थ्यांच्या पदवी शिक्षणाच्या सोयीसाठी हलकर्णीत वरिष्ठ महाविद्यालय मंजूर होणे आवश्यक आहे. त्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या बृहत् आराखड्यात हलकर्णीचा समावेश करण्यात यावा, असा ठराव पंचायत समितीच्या मासिक सभेत करण्यात आला.‘लोकमत’ने २० नोव्हेंबरच्या अंकात ‘पदवी शिक्षणासाठी दररोज ८० किलोमीटरचा प्रवास’ या मथळ्याखालील बातमीत गडहिंग्लजच्या पूर्वभागातील विद्यार्थ्यांच्या पदवी शिक्षणाची व्यथा मांडली होती. या बातमीच्या कात्रणासह त्याचा संदर्भ देत पंचायत समितीचे सदस्य बाळेश नाईक यांनी याप्रश्नी सभागृहात चर्चा घडवून आणली. अध्यक्षस्थानी सभापती अनुसया सुतार होत्या.नाईक म्हणाले, बृहत् आराखड्यात हलकर्णीचा समावेश नसल्याने हलकर्णीला वरिष्ठ महाविद्यालय मंजूर होऊ शकत नाही. त्यामुळे पूर्वभागातील सुमारे २३ खेड्यांतील विद्यार्थ्यांना दररोज पदवी शिक्षणासाठी गडहिंग्लजला यावे लागते.यामुळे आर्थिक भुर्दंडाबरोबरच त्यांचा वेळेचाही अपव्यय होत आहे. अनेक मुली पदवी शिक्षणापासून वंचित राहात आहेत.त्यामुळे मूलभूत शैक्षणिक गरज म्हणून हलकर्णी येथे वरिष्ठ महाविद्यालय मंजूर होणे आवश्यक आहे. त्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या बृहत् आराखड्यात हलकर्णीचा समावेश होणे आवश्यक आहे. त्याबाबतचा ठराव राज्यपाल तथा कुलपती, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री आणि कुलगुरू यांच्याकडे पाठवावा, अशी सूचना नाईक यांनी मांडली. त्यास सभागृहाने एकमताने मंजुरी दिली. गटशिक्षणाधिकारी डॉ. जी. बी. कमळकर यांनी हा ठराव संबंधितांना पाठविला जाईल, असे सांगितले.यावेळी उपसभापती तानाजी कांबळे, साहाय्यक गटविकास अधिकारी प्रदीप जगदाळे यांच्यासह सर्व सदस्य, विविध खात्यांचे प्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)