शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘ज्ञानगंगा घरोघरी’चा संकल्प अपूर्णच

By admin | Updated: March 30, 2015 00:15 IST

माणिकराव साळुंखे यांची खंत : ज्ञानाच्या प्रसारासाठी प्रयत्न करणार

सांगली : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे ‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे ब्रीदवाक्य असून, ते पूर्ण करण्यास आम्ही कमी पडलो आहोत. भविष्यात सामान्यांच्या घरात शिक्षणाची ज्ञानगंगा नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याचे मत कुलगुरू डॉ. माणिक साळुंखे यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केले.डॉ. साळुंखे म्हणाले, प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांनी लोकविद्यापीठाची संकल्पना मांडली होती. त्यांचेच कार्य मुक्त विद्यापीठ पुढे नेत आहे. सध्या महाराष्ट्रातील सात लाख विद्यार्थी मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. येथे शिकणारे सर्वजण नोकरी-व्यवसाय सांभाळून शिक्षण घेतात. मागील वर्षी २८० विद्यार्थ्यांनी बी. एस्सी. ची पदवी घेतली आहे. महत्त्वाचे म्हणजे या सर्वच विद्यार्थ्यांना चांगल्या कंपनीत नोकऱ्या लागल्या आहेत. कौशल्य विकासाला भविष्यकाळात अत्यंत महत्त्व येणार आहे. साहजिकच विद्यापीठाच्या माध्यमातून ‘स्किल डेव्हलपमेंट’ या विषयाकडे लक्ष देण्यात येणार आहे. आजकाल इतर विद्यापीठातून जे शिक्षण मिळते त्यामुळे केवळ पदव्या प्राप्त होतात. परंतु त्यातील बहुतांश ज्ञानाचा जीवनात वावरताना काहीही उपयोग होत नाही. शिक्षण हे सामान्यांच्या आवाक्यातील असले पाहिजे. मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची कवाडे खुली करुन दिली आहेत. त्याचा लाभ आज असंख्य विद्यार्थी घेत आहेत. स्पर्धा परीक्षा देणारे बहुतांश विद्यार्थी हे मुक्त विद्यापीठाला नेमलेल्या पुस्तकांचा अभ्यास करीत आहेत. (प्रतिनिधी)भविष्यात मोबाईलवरुन शिक्षण देणारप्रत्येकाकडे मोबाईल हमखास असतो. त्यामुळे भविष्यात मोबाईलच्या माध्यमातून शिक्षण देण्याचा नवीन प्रयोग करण्याचा मुक्त विद्यापीठाचा विचार आहे. पुढील वर्षापासून विद्यापीठात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसात संबंधित विषयांची पुस्तके घरपोच करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नवीन तीन अभ्यासक्रम देखील सुरु करण्यात येणार असल्याचेही डॉ. साळुंखे यांनी सांगितले.शिवाजी विद्यापीठ आणि मुक्त विद्यापीठ या दोन्ही ठिकाणी काम करतानाचा अनुभव भिन्न आहे. मुक्त विद्यापीठात नवनवीन उपक्रम राबविण्यास मोकळीक आहे, मात्र ते स्वातंत्र्य इतर विद्यापीठात नसल्याचे डॉ. साळुंखे यांनी सांगितले.