शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
2
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
3
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
4
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
5
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
6
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
7
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
8
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
9
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
10
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
11
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
12
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
13
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
14
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
15
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
16
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
17
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
18
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
19
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
20
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई

उचगावात दारू दुकाने, बीअर शॉपी बंद करण्याचा ठराव

By admin | Updated: August 18, 2015 23:55 IST

ग्रामसभा : आक्रमक ग्रामस्थांनी विविध प्रश्नांवर पदाधिकारी, सदस्यांना धरले धारेवर

उचगाव : उचगाव (ता. करवीर) येथील ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा झाली. ग्रामस्थांच्या सनदद्वारे गावातील देशी दारू दुकान, चार बीअर शॉपी, व्हिडिओ गेम बंद करण्याचा ठराव करण्यात आला. या देशी दारू, बीअर शॉपीला परवानगी देताना ग्रामस्थांना विचारात घेतले नाही. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक होऊन सरपंच, ग्रामसेवक, १७ सदस्यांना धारेवर धरण्यात आले. ही दारू दुकाने त्वरित बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. ग्रामसभेला पहिल्यांदाच लोकांनी उर्त्स्फूत प्रतिसाद नोंदविला. गावातील कचरा विल्हेवाट, चेतन मोटर्सजवळील कॉलनीचा रस्ता, भाजी मंडई, दलित वस्तीतील प्रवेशद्वार व समाज मंदिराचे नव्याने बांधकाम व्हावे, १८ अंगणवाड्यांचे बांधकाम व्हावे, एम.एस.ई.बी.च्या अधिकाऱ्यांना वाढीव बिलाबद्दल धारेवर धरले. मणेर मळ्यातील दुर्लक्षित रस्ता, बंधाऱ्याची डागडुजी, गाव तलावाचे सुशोभीकरण, ग्रामपंचायत कर्मचारी भरती, मटण मार्केटमधील गाळे-खोकी धारकांकडून वार्षिक कर आकारणी, चुना भट्टीतील निघणाऱ्या धुराच्या प्रश्नावर चर्चा झाली. जुन्या अंगणवाड्या पाडण्यात आल्या आहेत; पण निधी अभावी बांधकाम होत नसल्याने ग्रामस्थांनी निधी व जागा उपलब्ध होत नसेल, तर अंगणवाड्या पाडल्या का, असा सवाल उपस्थित केला. घरातील विद्युत रिडिंग मिटरचा फोटो घेण्याऐवजी बंद दरवाजाचा फोटो लाईट बिलावर येतो, मग ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले ते काय काम करतात. त्यामुळे लाईट बील जादा येते, अशा तक्रारी जास्त होत्या. मणेर मळ्यातील रस्त्याचा प्रश्न गंभीर आहे. त्याला तातडीने मंजुरी द्यावी, ग्रामपंचायतीच्या मोकळ््या जागांना कुंपण घालावे अशी मागणी करण्यात आली. दुपारी दोनला चालू झालेली ग्रामसभा सायंकाळी ७.३० पर्यंत चालू राहिली. यामुळे गावातील विविध प्रश्न आक्रमकपणे मांडण्यात आले. ग्रामसभेला सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्राम पंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. ( वार्ताहर )ग्रामसभेतील महत्त्वाचे मुद्देगावातील सर्व व्हिडीओ गेम पार्लर बंद करणे.चार ग्रामसभा घेण्याविषयी लोकांचा आग्रह, १५ आॅगस्ट, २६ जानेवारी, २ आॅक्टोबर, १ मे कामगारदिन या दिवशी ग्रामसभा घ्याव्यात. महिला सरपंच असूनही गावठी दारूबंदीसाठी पुढाकार का नाही, ग्रामस्थांचा सवाल ५० हजार लोकसंख्या तरीही सुविधांची वाणवादीडकोटी ग्रामपंचायत इमारत बांधकामास मंजुरी, पण फक्त पायाभरणीसाठी २५ लाख रुपये खर्चावर ग्रामस्थांची नाराजी