शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांना हटविण्याच्या शिफारसीचा सभेत करणार ठराव

By admin | Updated: March 15, 2015 00:43 IST

राज्य सरकारकडे कारवाईकरिता पाठविण्यात येणार

कोल्हापूर : खासगी स्वीय सहायकामार्फत लाच स्वीकारल्याचा गंभीर आरोप असलेल्या महापौर तृप्ती माळवी यांना महपौरपदावरून हटविण्यात यावे, अशी शिफारस राज्य सरकारकडे करण्याचा निर्णय कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी घेतला आहे. उद्या, सोमवारी होणाऱ्या महानगरपालिकेच्या सभेत तसा ठराव करून, तो राज्य सरकारकडे कारवाईकरिता पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे महापौर विरुद्ध नगरसेवक यांच्यातील संघर्षाने आता वेगळे वळण घेतले आहे. महापौर माळवी यांनी पदाचा राजीनामा द्यावा म्हणून त्यांच्यावर वेगवेळ्या प्रकारे नगरसेवकांकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असला, तरी त्या अद्याप बधलेल्या नाहीत. त्यांच्या सभेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु महापौरांनी बोलाविलेली सभा एकदा कोरमअभावी तहकूब झाली की ती दुसऱ्यावेळी कोरमशिवाय घेता येते हे स्पष्ट झाल्यामुळे नगरसेवक हवालदिल झाले. मग त्यांनी महापौरांच्या विरोधातच विशेष सभा बोलाविण्याची एकदा नाही, तर दोनवेळा मागणी केली. या मागणीतील हवा काढून टाकण्यासाठी माळवी यांनी आता उद्या नियमित सर्वसाधारण सभा बोलविली आहे. महापौरांनी दिलेल्या शहाला काटशह देण्याच्या हेतूने कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी उद्याच्या सभेत महापौरांच्या विरोधात दोन ठराव दिले आहेत. माळवी यांनी महापौरपदावर असताना लाच स्वीकारल्यामुळे महापौरपदाचे नैतिक अध:पतन झाले असून, त्यांना या पदावरून हटविण्यात यावे, अशी मागणी ठरावात करण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम १३(१) (अ) व (ब) तसेच कलम १० (१-१अ) मधील तरतुदींचा आधार घेण्यात आला आहे. हे दोन ठराव उद्याच्या सभेत मंजूर केले जातील, अशी अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)