शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

विभागात २३ लाख वृक्षलागवडीचा संकल्प

By admin | Updated: June 28, 2016 01:15 IST

शुक्रवारी लोकचळवळ : ४३९८ गावांतील १० लाख लोक सहभागी होणार, एम. के. राव यांची माहिती

कोल्हापूर : कोल्हापूर वनविभागात शुक्रवारी (दि. १) २३ लाख २५ हजार वृक्षलागवड करण्याचा संकल्प वनविभागाने केल्याची माहिती मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) एम. के. राव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. या लोकचळवळीत ४३९८ गावांतील सुमारे १० लाख लोक सहभागी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. वनक्षेत्र व वृक्षाच्छादन २० टक्क्यांवरून ३३ टक्क्यांपर्यंत नेण्याच्या दृष्टीने वन विभागाने ‘हरित महाराष्ट्र’ हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. यासाठी १ ते ७ जुलै या कालावधीत वनमहोत्सवाच्या माध्यमातून दोन कोटी वृक्षलागवड करण्याचा संकल्प आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्णांसाठी ११ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट दिले असले तरी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध शासकीय कार्यालये, स्वयंसेवी संस्थांच्या पाठबळावर २३ लाखांपर्यंत वृक्षलागवड करण्याचे नियोजन केले आहे. शुक्रवारपासून ११ हजार २५२ ठिकाणी वनविभाग, सामाजिक वनीकरण व इतर संस्थांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक व लोकप्रतिनिधींच्या हस्ते लागवड केली जाणार आहे. शिवाजी विद्यापीठात सकाळी नऊ वाजता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते ‘सुतार विहीर’ परिसरात हरित महाराष्ट्र कार्यक्रमास कोल्हापुरातून सुरुवात होणार आहे. पाचही जिल्ह्णांत हा कार्यक्रम राबविला जाणार असून यामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन एम. के. राव यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, दादा शेंडगे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)हजार झाडांमागे एक कुटुंब केवळ वृक्षलागवड करून चालणार नाही, त्यांचे संवर्धन झाले पाहिजे. यासाठी एक हजार झाडांमागे एक कुटुंबाची नेमणूक केली जाणार असून पाच वर्षांचा करार केला जाणार आहे. यासाठी संबंधित कुटुंबाला सरकार पैसे देणार आहे. त्याचबरोबर शाळांत ‘वृक्ष दत्तक’ योजना राबविणार असल्याचे राव यांनी सागिंतले. ‘बिग बी’ची भेट वृक्षारोपण करताना नागरिकांनी ‘सेल्फी विथ ट्री’ या स्पर्धेमध्ये आपले फोटोग्राफ्स पाठवावेत. १ जुलै रोजी सकाळी ६ ते ३ जुलैच्या रात्री बारापर्यंत फोटो पाठवावेत. लकी ड्रॉच्या माध्यमातून विजेते काढले जाणार असून विजेत्यांना व्याघ्रदूत अमिताभ बच्चन यांच्याशी हस्तांदोलन करण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर मेळघाट, ताडोबा येथील अभयारण्यांना मोफत भेटी देता येणार आहेत.