शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण पुनर्विचार परिषद उधळून लावणार

By admin | Updated: February 27, 2017 23:51 IST

आरक्षण समर्थन समितीचा इशारा : परिषदेसाठी केशवराव भोसले नाट्यगृह न देण्याचे महापौरांना निवेदन

कोल्हापूर : आरक्षणाचे जनक असलेल्या राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मभूमी व कर्मभूमीत ‘लोकमंच’तर्फे होणाऱ्या आरक्षण पुनर्विचार चळवळ परिषदेस महानगरपालिकेने केशवराव भोसले नाट्यगृह उपलब्ध करून देऊ नये. पुनर्विचार परिषदेच्या आडून कोणी आरक्षणाला विरोध करणार असेल, तर ती परिषदच उधळून लावू , असा इशारा सोमवारी राजर्षी शाहू महाराज आरक्षण समर्थन समितीतर्फे देण्यात आला. कोल्हापुरात स्थापन झालेल्या आरक्षण समर्थन समितीच्या शिष्टमंडळाने महापौर हसिना फरास यांची भेट घेऊन आरक्षण समर्थन समितीचे अध्यक्षपद स्वीकारून येथून पुढे होणाऱ्या लढ्याचे नेतृत्व करावे, असे आवाहन केले; परंतु महापौर फरास यांनी ही विनंती विनम्रपणे नाकारून लढ्यास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. माजी नगरसेवक सुनील मोदी यांनी २५ मार्चला कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहात आरक्षण पुनर्विचार चळवळ परिषदेचे आयोजन केले आहे. तसेच त्यांनी काही मागण्याही केलेल्या आहेत. ही परिषद म्हणजे सध्याच्या आरक्षण पद्धतीला विरोध करणारी आहे. त्यामुळे त्यासाठी महानगरपालिकेने नाट्यगृह उपलब्ध करून देऊ नये, अशी मागणीही यावेळी महापौरांकडे करण्यात आली. ओबीसींना आरक्षण मिळू नये, अशी ‘लोकमंच’ संघटनेची इच्छा आहे. या चळवळीमागे मोठे षङ्यंत्र आहे. त्यामुळे त्याला विरोध करून त्यांचे मनसुबे उधळून लावले पाहिजेत, अशा भावना अनेकांनी यावेळी व्यक्त केली. जर का नाट्यगृह उपलब्ध करून दिले तर ही परिषद उधळून लावली जाईल, असा इशाराच देण्यात आला. महापौरांना भेटलेल्या शिष्टमंडळात माजी महापौर नंदकुमार वळंजू, मारुतराव कातवरे, माजी उपमहापौर चंद्रकांत सांगावकर यांच्यासह व्यंकाप्पा भोसले, दिगंबर लोहार, सुभाष देसाई, प्रकाश कुंभार, सुजय पोतदार, किसन कल्याणकर, जहाँगीर अत्तार, बाळासाहेब भोसले, अस्लम बागवान, अशोक माळी, शिवानंद माळी, शीतल मंडपे, सुधाकर पेडणेकर, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)...तर रस्त्यावर उतरू : फरास सुनील मोदी कोणी मोठा माणूस नाही. त्यांच्या परिषदेमुळे आरक्षणही बदलणार नाही; परंतु त्यांच्या परिषदेच्या आडून कोणी ओबीसी आरक्षणाला आव्हान देत असेल तर अशा प्रवृत्ती कोल्हापूरच्या बाहेर हाकलण्याची ताकद दाखवून दिली जाईल. प्रसंगी त्यासाठी रस्त्यावर येऊ, असा इशारा माजी नगरसेवक आदिल फरास यांनी दिला. परिषदेस नाट्यगृह उपलब्ध करून दिले जाणार नाही, असे स्थायी सभापती संदीप नेजदार यांनी सांगितले.