कोल्हापूर : ‘दादा-बाबा बाहेर या, धनगरांना न्याय द्या’, ‘आदिवासी खात्याचे नाव अनुसूचित जमाती कल्याण करा’, अशा घोषणा देत आज, रविवारी मल्हार सेनेने मोटारसायकल रॅली काढून राज्य शासनाचा निषेध केला तसेच बारामतीतील उपोषणकर्त्यांना पाठिंंबा दिला.येथील दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सकाळी अकरा वाजता रॅलीला सुरुवात झाली. हातात पिवळे झेंडे, निषेधाचे फलक घेतलेले कार्यकर्ते शासनाच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देत होते. बिंदू चौक, शिवाजी पुतळा, भवानी मंडप, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका, रविवार पेठेतील बिरोबा मंदिराजवळ रॅलीचा समारोप झाला. याठिकाणी उपस्थितांनी उपोषणकर्त्यांना बळ देण्याचे साकडे बिरोबा देवाला घातले. यावेळी महाराष्ट्र विकास आघाडीचे अध्यक्ष अण्णाराव पाटील, मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे यांची भाषणे झाली. या रॅलीत मल्हार सेनेचे सचिव छगन नांगरे, राघू हजारे, प्रल्हाद देबाजे, शहाजी सिद, प्रकाश पुजारी, मारुती जानकर, बाळासाहेब दार्इंगडे, मलकारी लवटे, बयाजी शेळके, नाना पुजारी, मारुती अनुसे, साताप्पा रानगे, कृष्णात रेवडे, आनंदराव देशिंगे, आनंदराव डफडे, बाबूराज बोडके, बबलू फाले, नाना लांडगे, भीमराव हराळे, शामराव माने, सर्जेराव पुजारी, अशोक पुजारी, शिवगोंडा पुजारी, सागर गावडे, जर्नादन गावडे, बंडा बरगाले, विठ्ठल धनगर सहभागी होते. (प्रतिनिधी)
आरक्षण मिळालेच पाहिजे
By admin | Updated: July 28, 2014 00:03 IST