शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सर्व लिंगायत पोटजातींना आरक्षण द्या

By admin | Updated: February 10, 2017 00:34 IST

लिंगायत एकीकरण समितीची मागणी : प्रशासनाला निवेदन, धरणे आंदोलनाचा इशारा

कोल्हापूर : लिंगायत समाजातील सर्व जाती, उपजाती, पोटजातींना आरक्षण देण्यात यावे, या प्रमुख मागणीसह लिंगायत समाजास संविधानिक धर्ममान्यता तसेच अल्पसंख्याक दर्जा मिळावा, अशी मागणी गुरुवारी निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली. मेपर्यंत मागण्यांची पूर्तता न झाल्यास तालुका व जिल्हा पातळीवर धरणे आंदोलन करण्याचा इशारा शिष्टमंडळाने दिला. लिंगायत एकीकरण समिती, महाराष्ट्रतर्फे राज्यभर लिंगायत आरक्षण अभियान राबविण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून विविध अठरा मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळातर्फे जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. यावेळी प्रा. संगमेश्वर पानगावे, सुनील नष्टे, राजू वाली, रामलिंग गुजर, धर्मेंद्र नष्टे, आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे, महाराष्ट्रात लिंगायत समाजाची लोकसंख्या जवळपास एक कोटीच्या आसपास आहे. परंतु तो वीरशैव, लिंगधर, लिंगवत, लिंगडेर, लिंगायत पंचम अशा अनेक जाती, उपजाती, पोटजातींत विखुरला आहे. यांपैकी काहींना आरक्षणाचा लाभ मिळतो, तर काहींना त्यापासून वंचित राहावे लागते आहे. अशा सर्वच जाती व उपजातींना आरक्षण देऊन त्यांचा ‘ओबीसी’मध्ये समावेश कराव व समाजाचा आर्थिक, शैक्षणिक, राजकीयदृष्ट्या मागासलेपण दूर करावे. मागण्यांची पूर्तता न झाल्यास मेमध्ये तालुका व जिल्हा पातळीवर धरणे आंदोलन करण्यात येईल. अन्य मागण्या अशा : मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वर स्मारकाचे काम लवकर पूर्ण करावे.लिंगायत समाजासाठी गाव तिथे स्मशानभूमी, वसतिगृहांची निर्मिती व्हावी.‘महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळा’ची स्थापना करावीलिंगायत तत्त्वज्ञानाचे, साहित्याच्या अध्ययन व अध्यासन केंद्रांची स्थापना करावी.कोल्हापुरातील लिंगायत समाज एकीकरण समितीच्या शिष्टमंडळातर्फे गुरुवारी जिल्हा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी रामलिंग गुजर, राजू वाली, धर्मेंद्र नष्टे, प्रा. संगमेश्वर पानगावे, सुनील नष्टे उपस्थित होते.