शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

राखीव बटालियनच्या जवानाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 23:10 IST

कोल्हापूर : येथील भारत राखीव बटालियन-३ च्या जवानाने राहत्या मूळ गावी शेतवडीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस ...

कोल्हापूर : येथील भारत राखीव बटालियन-३ च्या जवानाने राहत्या मूळ गावी शेतवडीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले. सुशील सुधाकर भेंडे (वय ३५, रा. खेंडा, पोस्ट कुजबा, ता. कुट्टी, जि. नागपूर ग्रामीण) असे त्याचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना सेवेतून निलंबित केले होते. या नैराश्येतून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे.जवान सुशील भेंडे हे २०१३ मध्ये भारत राखीव बटालियन-३ मध्ये भरती झाले. सहा वर्षे त्यांनी सेवा बजावली. भारत राखीव बटालियनचे मुख्य कार्यालय कोल्हापुरातील कसबा बावडा येथील पोलीस मुख्यालयात आहे. या बटालियनचे जवान दौंड येथे असतात. या ठिकाणी सेवेत असताना सुशील भेंडे याची एका वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत वादावादी झाली. १० दिवसांपूर्वी त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली होती; त्यामुळे तो गावी येऊन राहिला होता. जादा ड्यूटी लावल्याच्या तणावातून त्याची अधिकाºयाशी वादावादी झाली होती. निलंबित केल्याने त्याची मानसिकता ढासळली होती. घरीदेखील तो मानसिक तणावाखाली होता. जास्त कोणाशी बोलत नव्हता. सोमवारी सकाळी त्याने शेतामध्ये गळफास घेतल्याचे उघडकीस आले.त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.जवानांना न्याय द्यावाभारत राखीव बटालियनच्या जाचक अटी व त्रासाबद्दल कोणी बोलले, तर त्याला शारीरिक व मानसिक त्रास सहन करून प्रसंगी नोकरी गमवावी लागते. या जवानांची नोकरी २४ तास आहे. त्यांच्या मानसिकतेचा विचार शासन करीत नाही. जिल्हा बदली १५ वर्षांनी केली आहे. ती १० वर्षांनी करावी, म्हणून जवान शासनदरबारी न्याय मागत आहेत. कामाच्या अतिरिक्ततणावामुळे अनेक जवानांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे, तर काहींनी प्रयत्न केला आहे. त्याचाच सुशील भेंडे बळी आहे. शासनाने या जवानांच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी जवानांतून होत आहे.