शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

नुकसानभरपाईसाठी अधिकाऱ्यांना विनवण्या

By admin | Updated: June 1, 2015 00:13 IST

एजिवडे अभयारण्यग्रस्तांची व्यथा : पूर्ण रक्कम मिळेपर्यंत स्थलांतर नाही

राधानगरी : ऐच्छिक पुनर्वसनाचा पर्याय स्वीकारलेल्या एजिवडे  (ता. राधानगरी) येथील अभयारण्यग्रस्तांवर भरपाईची संयुक्त खात्यावरील रक्कम काढण्यासाठी अधिकाऱ्यांचे उंबरे झिजवून थकण्याची वेळ आली आहे. ही रक्कम प्रकल्पग्रस्त व तहसीलदार यांच्या संयुक्त बँक खात्यावर जमा आहे.राज्य शासनाने ३ नोव्हेंबर २०१२ च्या शासन निर्णयानुसार अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने व वन प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी ‘ऐच्छिक पुनवर्सन’ हा पर्याय उपलब्ध करून दिला. राधानगरी अभयारण्यातील प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसनावर ठोस निर्णय होत नव्हता. त्यामुळे येथील काही वाड्या-वस्त्यांनी ऐच्छिक पुनर्वसनाचा पर्याय स्वीकारला. एका कुटुंबाला एकरकमी दहा लाख रुपये मिळण्याची तरतूद आहे.येथील एजिवडे ‘ऐच्छिक पुनर्वसन’ पर्याय स्वीकारलेले राज्यातील पहिले गाव ठरले आहे. येथील सर्व १३२ कुटुंबांनी गतवर्षी आवश्यक हक्कसोड पत्रे वनविभागाला दिली आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात सर्वांना प्रत्येकी एक लाख रुपये त्यांच्या वैयक्तिक बँक खात्याद्वारे मिळाले. मध्यंतरी निधी नसल्याने प्रक्रिया ठप्प झाली होती. मार्च २०१५ मध्ये निधी उपलब्ध झाल्यावर ही रक्कम प्रकल्पग्रस्त व राधानगरीचे तहसीलदार यांच्या संयुक्त खात्यावर जमा आहे.यातील अटींनुसार अगोदर मिळालेल्या एक लाखातून प्रकल्पग्रस्तांनी अभयारण्याच्या हद्दीपासून दहाकिलोमीटर जंगलाबाहेर घरासाठी जागा पाहून ती त्यांच्या नावावर झाल्यावर संयुक्त खात्यावरील चार लाख रुपये घरबांधणीसाठी मिळणार आहेत. येथील नागरिकांनी फोंड्या (ता. कणकवली)जवळ एकाच ठिकामी जमीन घेतली आहे. मात्र, सध्याची किंमत, त्याबाबतचा खर्चही जास्त असल्याने पुढील रक्कम मिळणे आवश्यक आहे. काहींनी स्वगुंतवणुकीतून ही प्रक्रिया पूर्ण करून पैसे मिळण्यासाठी तहसीलदारांशी संपर्क साधला. मात्र, या पदावरील व्यक्ती बदलल्यामुळे त्यांनी वरिष्ठांकडून लेखी आदेश नसल्याचे कळविले आहे. (प्रतिनिधी)पावसाळ््यामुळे प्रक्रिया लांबणारपावसाळा तोंडावर आल्याने ही सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन घरे बांधणे शक्य नाही. पुढील वर्षापर्यंत बदलणारी परिस्थिती, पैसे वेळेत न मिळाल्यास जमिनी खरेदीसाठी येणाऱ्या अडचणी यामुळे हे प्रकल्पग्रस्त चिंतेत आहेत. त्यांनी याबाबत जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. पूर्ण रक्कम मिळेपर्यंत एकही कुटुंब स्थलांतर होणार नाही, असे निवेदनात म्हटले आहे.