शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित प्रश्नांसाठी तेरावेळेला निवेदन

By admin | Updated: February 9, 2015 23:58 IST

प्रशासनाकडून बेदखल : ‘राष्ट्रवादी’ एस. टी. संघटनेचे आमरण उपोषण सुरू

कोल्हापूर : राष्ट्रवादी मजदूर काँग्रेसशी संलग्न राष्ट्रीय एस.टी. कामगार काँग्रेस संघटनेतर्फे प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक न झाल्याने सोमवारपासून विभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन सुरु केले. आज पहिल्या दिवशी खासदार धनंजय महाडिक यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलनास पाठिंबा दिला. मात्र दिवसभर प्रशासनाच्यावतीने कोणीच आंदोलकांची दखल घेतली नाही. संघटनेच्यावतीने ५७ प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी विभाग नियंत्रक सुहास जाधव यांना तेरा वेळेला निवेदन दिले. संघटनेच्यावतीने आमरण उपोषणास बसण्यात येईल, असे इशाऱ्याचे पत्र देवून सुध्दा त्यांनी कोणतीच दखल न घेतल्याने. हे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी विभागीय कार्यालयासामोर उपोषणास बसण्यात आले. विभागीय अध्यक्ष विजय भोसले व सचिव संजीव चिकुर्डेकर हे दोघेजण उपोषणास बसले आहेत. कामगारांच्या हक्कासाठी हा लढा कायम ठेवण्याचा निर्धार त्यांनी कायम ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. सायंकाळी महामंडळाचे विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी संभाजी पाटील, कामगार अधिकारी प्रवीण पाटील यांनी भेट घेतली. मात्र आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आर. के. पवार, स्थायी समिती सभापती आदिल फारस यांनी फोन करून पाठिंबा दिला. संघटनेचे सभासद आर.के. शेटे व आर. एस. पाटील यांच्या अन्यायी पध्दतीने बदल्या केल्या आहेत. त्या पूर्ववत व्हाव्यातविभागामध्ये पक्षपातीपणे व अन्यायी धोरणाने कमी बेसिकांच्या चालक व वाहकां ऐवजी जादा बेसिक चालक व वाहकांना ओव्हर टाईम व डबल ड्युट्या दिल्या जातात. संभाजीनगर आगारप्रमुख यांच्या पक्षपाती अन्यायी धोरणाबाबत कार्यवाही व्हावी विनंती बदल्याबाबत संघटनेस न्याय देणे. मनमानी पध्दतीने केलेल्या बदल्या रद्द करावेतकागल आगारातील कार्यरत असलेले वाहक पती-पत्नी यांची साप्ताहिक सुट्टी एकाच दिवशी करावीप्रशासनाकडून संघटनेची होणारी फसवणूक थांबवावी यासह ५७ कोणत्याही प्रवर्गातील बदल्या विनंतीनुसार व क्रमवारीने केलेल्या नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर मोठा अन्याय मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार आहे. आमच्या मागण्या बाबत विभाग नियंत्रकांना पत्र दिले होते. त्यांनी एक वेळेला चर्चा करण्यासाठी बोलविलेही होते. चर्चामध्ये प्रश्न मार्गी लावण्या बाबत आश्वासनही दिले होते. मात्र आमचे प्रश्न मार्गी न लावल्याने आम्ही आंदोलन करत आहे. - संजीव चिकुर्डेकर आंदोलनांची दखल नाहीएस.टी. महामंडळाचे संचालक व राष्ट्रवादीचे नेते ए.वाय.पाटील यांना संघटनेच्यावतीने आंदोलनाबाबत रितसर पत्र दिले होते. तरीही त्यांनी आंदोलनांची साधी दखलही घेतली नाही. आपल्याच पक्षांच्या नेत्यांनी संघटनेची दखल घेतली नाही अशी चर्चा आंदोलनस्थळी सुरु होती.